
Swara Bhaskar Wedding : 'स्वरानं या कानाच त्या कानाला कळू दिलं नाही!' तिचा पती आहे तरी कोण?
Swara Bhaskar bollywood actress wedding : बॉलीवूडची प्रसिद्ध तारका स्वरा भास्कर अखेर विवाहबद्ध झाली. आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे, परखड मत प्रदर्शनासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीनं कुणालाही न सांगता, सोशल मीडियावर पोस्ट न करता गुपचूप लग्न केलं आहे. कोर्ट मॅरेज करुन बाहेर पडलेल्या स्वराच्या पतीविषयी चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे.
स्वरानं समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमद सोबत लग्न केले आहे. त्यानंतर ही व्यक्ती आहे तरी कोण याचा गुगलवर शोध घेतला जात आहे. स्वरानं देखील यापूर्वी त्या व्यक्तीविषयी कुठेच खुलासा केलेला नव्हता की त्या दोघांविषयी कोणतीही पोस्ट व्हायरल झालेली नव्हती. आता मात्र थेट त्या दोघांचे लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानं वेगळ्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
Also Read - नेट बँकिंग सुविधा वापरताय? मग हे नक्कीच वाचा...
फहाद अहमद यांच्याविषयी सांगायचे झाल्यास ते समाजवादी पार्टीचे मोठे नेते आहेत. याशिवाय ते समाजवादी युवजन सभेचे प्रदेशाध्यक्ष आहे. ते महाराष्ट्रातील समाजवादी पार्टीशी देखील जोडले गेले आहेत. स्वरा भास्करनं मात्र तिच्या या वैवाहिक नात्याविषयी यापूर्वी कोणताही खुलासा केला नव्हता. कुणालाही काहीही सांगितलेही नव्हते. त्यामुळेच की काय चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, स्वरानं एवढं सिक्रेट का ठेवलं?
स्वराचे गेल्या वर्षी चार चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यात एका वेबसीरिजचा देखील समावेश होता. आता स्वराच्या या गोड बातमीनं चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी तिच्या वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. स्वरानं जो लग्नाचा सर्जिकल स्ट्राईक केला आहे त्याची आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे. स्वरानं आतापर्यत वेगवेगळ्या बॉलीवूड सेलिब्रेटींसोबत काम केले असून तिच्या निल बटे सन्नाटा आणि तनु वेड्स मनू या चित्रपटातील अभिनयानं प्रेक्षकांना जिंकून घेतले होते.
३४ वर्षीय स्वरा भास्करनं २०१० मध्ये गुजारिश फिल्म पासून सुरुवात केली होती. त्यानंतर २०११ मध्ये आलेल्या तनु वेडस् मनू मध्ये देखील तिच्या भूमिकेनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. स्वरा ही दिल्लीतील मिरांडा हाऊसमधून पदवीधर झालेली आहे. याशिवाय तिनं जेएनयु विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे.