esakal | स्वरानं केलं पाकिस्तानचं कौतूक म्हणाली, ‘धन्यवाद शेजाऱ्यांनो’

बोलून बातमी शोधा

Swara bhaskar  praises

स्वरानं केलं पाकिस्तानचं कौतूक म्हणाली, ‘धन्यवाद शेजाऱ्यांनो’

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर स्वरा नेहमी सक्रिय असते. देशात सुरू असणाऱ्या घटनांबद्दस तसेट चित्रपटसृष्टीबद्दल आपले मत ती सोशल मीडियावर व्याक्त करते. अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्यामुळे तिला ट्रोल देखील केले जाते. सध्या ट्विटरवर पाकिस्तान स्टँड्स विथ इंडिया हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. यावर अभिनेत्री कंगनाने ट्विट करत पाकिस्तानची स्तुती केली. त्यानंतर नुकतच स्वराने पाकिस्तानचे कौतुक करत ट्विट केले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान म्हणाले, ‘दोन्ही देशांनी या जागतिक समस्येला तोंड द्यायला हवं. त्यासाठी माणुसकीचा आधार घ्यायला हवा’ या पाकिस्तानच्या विचाराचे स्वराने कौतुक केले आहे. ट्विट करत स्वरा म्हणली,‘ पाकिस्तानमधला समाज सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतासाठी पुढे येत आहे हे काळजाला भिडणारं आहे. अशा या परिस्थितीत पाकिस्तान पुढे येत आहे हे सत्य माहित असूनही की भारतीय मीडिया आणि जनता कायम पाकिस्तानची खलनायकी प्रतिमा रंगवत आहे. मन मोठं केल्याबद्दल तुमचे आभार शेजाऱ्यांनो!’ या ट्विटची चर्चा सोशल मीडियावर आता चांगलीच रंगलीय आहे.

पाकिस्तान स्टँड्स विथ इंडिया या हॅशटॅगवर अभिनेत्री कंगणा रणौतने देखील ट्विट केले आहे. कंगनाने पोस्ट केले, ‘पाकिस्तानच्या ट्विटरवर टॉप ट्रेंड होणार हॅशटॅग #PakistanstandswithIndia पाहून आनंद झाला. भारताचे वीर पुरूष मोदींनी दिलेल्या लसीचे त्यांनी कौतुक केले, या कठीण काळात आम्ही त्यांच्या सहानुभूतीचा आदर करतो.’

देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे, अशावेळी पाकिस्तान स्टँड्स विथ इंडिया या ट्विटरवरील हॅशटॅगमुळे अनेक नेटकऱ्यांच्या भूवया उंचावल्या आहेत. तसेच या ट्रेंडमुळे पाकिस्तान देशाचे अनेक भारतीय सेलिब्रेटी कौतुक करत आहेत हे पाहून या सेलिब्रेटींना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.