Swara Bhaskar: लग्नाच्या ४ महिन्यातच स्वरा भास्कर गरोदर? सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swara Bhaskar, Swara Bhaskar news, Swara Bhaskar pregnant

Swara Bhaskar: लग्नाच्या ४ महिन्यातच स्वरा भास्कर गरोदर? सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली बातमी

Swara Bhaskar Pregnant News: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्री अनेकदा कोणत्या ना कोणत्या विधानामुळे चर्चेत असते.

स्वरा भास्करने फेब्रुवारी २०२३ मध्ये समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदसोबत लग्न केले. स्वराच्‍या लग्‍नानंतर लोकांनी तिला लग्‍नासाठी खूप शुभेच्छा दिल्या, पण दुसरीकडे अभिनेत्रीला ट्रोल करण्‍याचे प्रमाणही खूप वाढले.

आता यानंतर पुन्हा एकदा स्वराविषयीची एक बातमी चांगलीच व्हायरल होत आहे. लग्नाच्या तब्बल 4 महिन्यांनंतर आता अभिनेत्रीबद्दल एक बातमी येत आहे की स्वरा भास्कर प्रेग्नंट होती आणि तिने एका मुलाला जन्म दिला आहे. काय आहे या बातमीमागची सत्यता जाणून घेऊ..

(Swara Bhaskar pregnant within 4 months of marriage? The news spread on social media)

काय आहे बातमी?

खरं तर, ट्विटरवर न्यूज 24 च्या नावाने केलेल्या कथित ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात दावा केला आहे की 'स्वरा भास्करच्या पतीने आपल्या पत्नी गरोदर असल्याची बातमीची पुष्टी केली आहे आणि ती जुलै महिन्यात आई होऊ शकते'.

तर दुसरीकडे अयोध्येचे महंत राजू दास यांनीही स्वराच्या प्रेग्नंन्ट आक्षेपार्ह ट्विट केले आहे. न्यूज 24 च्या कथित ट्विटच्या स्क्रीनशॉटमध्ये असे म्हटले आहे की, 'स्वरा भास्कर गरोदर आहे,

पती फवाद अहमदने या बातमीला दुजोरा दिलाय, जुलैमध्ये प्रसूती होऊ शकते, स्वराने फेब्रुवारी महिन्यातच तिच्यापेक्षा 8 वर्षांनी लहान फवादशी लग्न केले होते. .'

काय आहे सत्यता?

आता न्यूज 24 च्या ऑफिशियल अकाउंटवरून या कथित ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करून ही बातमी खोटी असल्याचं सांगितलं जात आहे. न्यूज 24 ने अशी कोणतीही बातमी लिहिली नाही.

न्यूज 24 ने ट्विट केले की, 'फेक अलर्ट.., अभिनेत्री स्वरा भास्करशी संबंधित हे फेक ट्विट न्यूज 24च्या नावाने सोशल मीडियावर शेअर केले जात आहे, ते पूर्णपणे फेक आहे, न्यूज 24 ने असे कोणतेही ट्विट केलेले नाही.'

त्यामुळे स्वरा भास्कर गरोदर नसून तिच्या गरोदरपणाची खोटी बातमी पसरवली जात आहे.