Swara Bhaskar: आपण कोणासाठी मतदान केलंय बघा... स्वरा भास्करची मोदींवर जहरी टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swara Bhaskar, Swara Bhaskar news, Swara Bhaskar on modi

Swara Bhaskar: आपण कोणासाठी मतदान केलंय बघा... स्वरा भास्करची मोदींवर जहरी टीका

Swara Bhaskar News: आज नवीन संसद भवनाचं उद्घाटन झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनचं उद्घाटन झालंय. या सोहळ्याला अनेक राजकीय नेते उपस्थित होते.

तर दुसरीकडे मात्र भारतीय कुस्तीचे अध्यक्ष बृजभूषण आणि इतर प्रशिक्षकांनी महिला कुस्तीगीरांचे लैंगिक शोषणाचा केल्याचा आरोप भारताचे यशस्वी मल्ल विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि राक्षी मलिक यांनी केला आहे. या कुस्तीपटूंचं आंदोलन चिघळल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.

(Look who you voted for... Swara Bhaskar's venomous criticism on narendra modi)

याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री स्वरा भास्करने मोदी सरकारवर अप्रत्यक्ष टिका केलीय. स्वराने मोदी सरकारचा एक फोटो पोस्ट केलाय.

या फोटोत अनेक साधूबाबांसोबत मोदी उभे आहेत असा एक फोटो दिसतोय. तर दुसरीकडे भारतीय कुस्तीपटू महिला दिसून येत आहेत. या महिलांना रस्त्यावर मारहाण झालेली दिसतेय तसेच भारताचा तिरंगा रस्त्यावर पडलेला दिसतोय.

हा फोटो कोलाज करून स्वराने विरोधाभास दाखवलाय. स्वरा लिहिते.. भारत अशीच प्रगती करत राहील.. आपण कशासाठी मतदान केले आहे ते येथे आहे!

अशी पोस्ट करत स्वराने भीषण परिस्थिती उलगडली आहे. स्वराच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी स्वराने केलेल्या ट्विटचं समर्थन केलंय. तर अनेकांनी स्वरावर टीकाही केलीय.

काय आहे प्रकरण जाणून घेऊ?

भारताची ऑलिम्पिक पदक विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने आत ट्विट करून आंतरराष्ट्रीय खेळाडूंना कुस्तीपटूंना पाठिंबा देण्याची मागणी केली.

दिल्लीच्या जंतर मंतरवर भारतीय महिलाकुस्तीपटू बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केली होती.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे उद्घाटन झाले. या इमारतीसमोरच भारतीय महिला कुस्तीपटू आंदोलन करणार होत्या.

मात्र त्यापूर्वीच कुस्तीपटू आणि त्यांच्या समर्थकांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. पोलिसांकडून आंदोलक पैलवानांवर कारवाई झालीय. याशिवाय जंतर-मंतरवरील तंबू उखडण्यात आले आहेत.