अभिनेत्री स्वरा भास्करने केले कन्हैय्या कुमारचे कौतुक, आज तर... | Swara Bhaskar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swara Bhaskar And Kanhaiya Kumar

अभिनेत्री स्वरा भास्करने केले कन्हैय्या कुमारचे कौतुक, आज तर...

ईडीकडून राहुल गांधींना चौकशीसाठी बोलवल्याने काँग्रेस पक्षाकडून सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. या दरम्यान काँग्रेस नेते कन्हैय्या कुमारने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. कन्हैय्याने 'अग्निपथ योजना' चुकीची असल्याचा हल्लाबोल केला आहे. या सत्याग्रहाप्रसंगी भाषण देताना कन्हैय्या कुमारचा व्हिडिओ शेअर करत बाॅलीवूड अभिनेत्री स्वरा भास्करने (Swara Bhaskar) त्याचे कौतुक केले आहे. त्यावर युजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत. (swara bhaskar shares kanhaiya kumar video Of Satyagrah)

स्वराने कन्हैय्याच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर करत म्हटले, कन्हैय्या कुमार (Kanhaiya Kumar) आज फाॅर्ममध्ये आहे. मतभेद, योद्धा, चांगल्या प्रकारे तयारी हे ऐकायला फार मजा आली. स्वराला नेहमी ट्रोल केले जात असते. आता कन्हैय्या कुमारने पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे समर्थन केल्यावर अभिनेत्रीला युजर्सने टीका केली आहे. ब्रजेश कसत म्हणतात, अफझल गुरु आम्हाला लाज वाटते, तुमचा मारेकरी जिवंत आहे, अशा घोषणा देणाऱ्या कंसरुपी कन्हैय्या, लष्कराच्या जवानांना बलात्कारी म्हणणारा गद्दार आहे. आणि तुम्हाला अशाला ऐकणे आनंद वाटते. हा तुमचा क्रूर चेहरा आणि खोटे व्यक्तिमत्त्व दाखवते.

चाचा मोंक नावाच्या यूजरने लिहिले, भाषण तर हे चांगले करतात. मात्र पुन्हा निवडणुकीत त्याची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. राहुल नावाच्या यूजरने लिहिले, कोणालाही हा काय बोलतो याने फरक पडत नाही. दिवा जेव्हा मावळायला येतो तेव्हा तो जास्त फडफडतो. एवढीशी गोष्टही तुम्हाला कळत नाही. जीवनात कधी तरी चांगले काम करा, असा सल्ला वैभव यांनी स्वरा भास्कर यांना दिला.