
Swara Bhaskar: आजी-आजोबांच्या घरी पूर्ण रितीरिवाजांनी स्वरा करणार या दिवशी लग्न
स्वरा भास्कर सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. अलीकडेच तिने समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केले आहे. अचानक स्वराने लग्नाचे फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले. आता दोघेही लवकरच पूर्ण विधींनी पुन्हा लग्न करणार आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या लग्नाचे फंक्शन पुढील आठवड्यात सुरू होत आहेत. जोडप्याच्या पारंपारिक विवाहात कोणते फंक्शन होणार आहेत? जाणून घेऊया.
रिपोर्ट्सनुसार, स्वरा आणि फहादच्या पारंपारिक लग्नापूर्वी हळदी, मेहेंदी आणि संगीत समारंभ होणार आहेत. हे सर्व कार्यक्रम 11 मार्च ते 16 मार्च या कालावधीत होणार आहेत.
स्वराच्या कुटुंबातील जवळच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'डेस्टिनेशन वेडिंगऐवजी स्वरा दिल्लीतील तिच्या आजोबा आणि आजीच्या घरी पूर्ण विधीसोबत लग्न करणार आहे. लग्नाची तयारी सुरू झाली आहे. स्वराने सर्व विधींची तयारी सुरू केली आहे.
रिपोर्ट्सनुसार, लग्नात सहभागी होणार्या सर्व जवळच्या मित्रांना आणि नातेवाईकांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे. स्वरा भास्करने नुकतेच तिच्या इंस्टा स्टोरीवर हनीमूनचे फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. स्वराने तिच्या हनिमून बेडचा फोटो शेअर केला आहे.
जो गुलाब आणि इतर फुलांनी सजलेला आहे. स्वराच्या आईने हा पलंग स्वतःच्या हातांनी सजवला आहे. यासाठी स्वराने तिच्या आईचे आभार मानले आहेत. तिच्या आईचा उल्लेख करत तिने लिहिलयं आईने माझा हनीमुन फिल्मीस्टाईलमध्ये बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला आहे.
स्वरा आणि फहादची भेट 2020 मध्ये झाली होती. एका आंदोलनादरम्यान दोघांची भेट झाली आणि त्यांची मैत्री झाली. या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले, त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. स्वराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ही अभिनेत्री तिच्या 'मिसेस फलानी' चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे.