'स्वराज्य जननी जिजामाता' सिरीयलच्या माध्यमातून टीव्हीवर नाव आणण्याची संधी!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

तुम्हाला तुमचं नाव टीव्हीवर आणण्याची एक नामी संधी आली आहे. सोनी मराठीच्या उपक्रमात सहभागी होऊन हे करता येऊ शकतं. तसेच, या उपक्रमाच्या सहाय्याने जिजामातांच्या सन्मानगीतासाठी योगदान देता येणार आहे. 

मुंबई: तुम्हाला तुमचं नाव टीव्हीवर आणण्याची एक नामी संधी आली आहे. सोनी मराठीच्या उपक्रमात सहभागी होऊन हे करता येऊ शकतं. तसेच, या उपक्रमाच्या सहाय्याने जिजामातांच्या सन्मानगीतासाठी योगदान देता येणार आहे. 

जिजामातांच्या सन्मानगीतासाठी योगदान देण्याकररिता जिजामातांच्या कार्याचे वर्णन करणारी तुमच्या शब्दातील एक ओळ सोनी मराठीच्या फेसबुकवर कमेंट्समध्ये पाठवावी लागणार आहे. सोबत सोनी मराठीने आकर्षक बक्षीसं जिंकण्याचीही संधी दिली आहे.

दरम्यान, सोनी मराठी या टीव्ही चॅनलवर दिनांक 19 ऑगस्टपासून 'स्वराज्य जननी जिजामाता' ही जिजामातांच्या आयुष्यावरील सिरीयल चालू होणार आहे. त्यानिमीत्त सोनी मराठीकडून ही स्पर्धा घेण्यात येत आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swarajya Janani Jijamata Sirial Starts on Sony mrathi From 19 Augast