'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत घडणार एक वाईट घटना

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

येसूबाई काकुळतीला येऊन सोयरा मातोश्रींना दरवाजा उघडा म्हणून सांगतात. पण त्या कोणाचंच ऐकत नाहीत. सोयरा मातोश्रींना आपला भूतकाळ आठवायला लागतो. त्यांनी शंभूराजेंचे केलेले लाड त्यांना आठवतात. त्यामुळे तर त्या जास्त पश्चात्तापाच्या आगीत होरपळायला लागतात.

मुंबई : सध्या छोट्या पडद्यावर लोकप्रिय असलेल्या 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत एक वाईट घटना घडणार असून, त्यामुळे रायगड हादरून जाणार आहे.

शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांची भूमिका असलेल्या संभाजी मालिकेत एक वाईट घटना घडणार आहे. कारभाऱ्यांना शिक्षा झाल्यानंतर शंभूराजे थेट सोयरा मातोश्रींना भेटायला त्यांच्या महाली येतात. तुम्ही कारभाऱ्यांना का थांबवलं नाहीत, हे विचारतात. त्यांची मूकसंमती होती, असेही म्हणतात. संभाजी महाराज सोयराबाईंना नजरकैदेत ठेवतात. सोयरा मातोश्रींना झालेल्या घटनेचा पश्चात्ताप होतो. आपल्या हातून एवढी मोठी चूक कशी घडली, याबद्दल त्या स्वत:लाच प्रश्न विचारतायत. दोषी मानतात. त्यांना महालाचा दरवाजा बंद ठेवला.

येसूबाई काकुळतीला येऊन सोयरा मातोश्रींना दरवाजा उघडा म्हणून सांगतात. पण त्या कोणाचंच ऐकत नाहीत. सोयरा मातोश्रींना आपला भूतकाळ आठवायला लागतो. त्यांनी शंभूराजेंचे केलेले लाड त्यांना आठवतात. त्यामुळे तर त्या जास्त पश्चात्तापाच्या आगीत होरपळायला लागतात. सोयराबाई फक्त आपले भाऊ हंबीरमामांना भेटतात. तेही मातोश्रींना दोन शब्द सुनावतात. सोयराबाई हंबीरमामांना सांगतात, आता मुक्काम हलवायची वेळ आली. रायगडावर शेवटी ती घटना घडतेच. पश्तात्तापानं होरपळलेल्या सोयराबाई प्राण त्याग करतात. त्यांचा मृत्यू होतो. झाल्या घटनेनंतर रायगड हादरतो. आपण सोयरा मातोश्रींना जास्त बोललो म्हणून असे घडलं याची खंत शंभूराजांना वाटते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: swarajyarakshak sambhaji serial scene