esakal | स्वाती आणि संग्राम अडकणार लग्नबंधनात; पण हे लग्न निर्विघ्नपणे पार पडेल का?
sakal

बोलून बातमी शोधा

chandra aahe sakshila

या लग्नसोहळ्यात श्रीधर आणि स्वातीचा सामना होईल का?

स्वाती आणि संग्राम अडकणार लग्नबंधनात; पण हे लग्न निर्विघ्नपणे पार पडेल का?

sakal_logo
By
स्वाती वेमूल

स्वाती आणि श्रीधर यांच्यातील हळुवार प्रेमकहाणी 'चंद्र आहे साक्षीला' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. चिन्मय मांडलेकर लिखित ही मालिका ११ नोव्हेंबरपासून सुरू झाली असून सध्या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. स्वातीच्या आयुष्यात पुन्हा एकदा सुखाची चाहूल लागली आहे. संग्रामच्या येण्याने स्वाती आता कुठेतरी श्रीधरने दिलेल्या धोक्यातून बाहेर येऊ लागली आहे. काही दिवसांपूर्वीच संग्रामने स्वातीला लग्नाची मागणी घातली होती. स्वातीने लग्नाला होकार दिला असून तिच्या घरी जोरदार तयारी सुरू आहे. 

स्वाती आयुष्यात आलेल्या कसोट्यांना आजवर खूप धीराने सामोरी गेली. कितीही खडतर प्रवास असला तरी देखील तिने न खचता त्यांना तोंड दिलं. श्रीधरकडून झालेल्या फसवणुकीनंतर स्वातीसाठी लग्नाचा निर्णय घेणं थोडसं कठीण होतं. पण, अखेर तिने निर्णय घेतला आणि तो क्षण आता आला आहे. स्वाती आणि संग्राम आता लग्नाच्या पवित्र बंधनात बांधले जाणार आहेत. स्वातीच्या आयुष्याला आता नव्याने सुरुवात होणार आहे. 

हेही वाचा : 'सोशल मीडियावर जाहीर चर्चा नको'; मंदार देवस्थळी प्रकरणावरून अमेय खोपकरांचं आवाहन 

या लग्नसोहळ्यात श्रीधर आणि स्वातीचा सामना होईल का, हा सोहळा आनंदात पार पडत असताना श्रीधर मिठाचा खडा तर टाकणार नाही ना, श्रीधरच्या येण्याने कोणतं नवं वळण येईल, हे लग्न निर्विघ्नपणे पार पडेल का, या सर्वांची उत्तरं प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल. ही मालिका सोमवार ते शनिवारी ८.३० वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.