esakal | '९ वर्षांची सोबत आणि ती पहिली भेट', स्वप्नील जोशीने पत्नीला रोमँटिक अंदाजात दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
sakal

बोलून बातमी शोधा

swapnil joshi

स्वप्निल आणि लीना यांच्या लग्नाचा नववा वाढदिवस होता. या खास दिवशी स्वप्नीलने हटके अंदाजात त्याच्या पत्नीला शुभेच्छा दिल्या आहेत.

'९ वर्षांची सोबत आणि ती पहिली भेट', स्वप्नील जोशीने पत्नीला रोमँटिक अंदाजात दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- मराठी सिनेसृष्टीत चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता स्वप्नील जोशी आणि त्याची पत्नी लीना यांचा लग्नाचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. दोघांमध्ये किती चांगलं बॉन्डिंग आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. त्यांचे व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओ यांमध्ये त्यांचं हे बॉन्डिंग कळून येतं. त्याच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं असून आता त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे.

हे ही वाचा: सुशांतच्या आठवणीत उषा नाडकर्णी झाल्या भावूक, म्हणाल्या “मी माझा...”​

सिनेइंडस्ट्रीत तसं पाहायला गेलं तर एकमेकांच्या बिझी शेड्युअलमधून एकमेकांना वेळ देणं आणि त्याची सांगड घालणं तितकं सोपं नाही. मात्र तरी आयुष्यातील काही खास प्रसंग तरी एकमेकांसोबत घालवण्यासाठी वेळ राखून ठेवावी लागते. स्वप्निल आणि लीना यांच्या लग्नाचा नववा वाढदिवस होता. या खास दिवशी स्वप्नीलने हटके अंदाजात त्याच्या पत्नीला शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर लीनासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करत स्वप्रिलने त्याचं प्रेम व्यक्त केलं आहे.

स्वप्नील-लीना यांचं लग्न १६ डिसेंबर २०११ रोजी पार पडलं होतं. दोघांचं हे अरेंज मॅरेज आहे. त्यामुळे त्यांचा रितसर बघण्याचा कार्यक्रम झाला होता. मात्र हा कार्यक्रम काही टिपिकल कांदे-पोह्याचा नव्हता. तर या दोघांची पहिली भेट एका कॉफी शॉपमध्ये झाली होती. लीना स्वप्निलची वाट बघत कॉफी शॉपमध्ये बसली होती. त्या दिवशी स्वप्निल रात्री साडे अकरा पर्यंत शूटिंग करत होता. शूटिंग संपवून तो लेट नाईट लीनाला भेटायला कॉफी शॉपमध्ये आला. एक मुलगी आपली वाट बघत एवढ्या रात्री थांबते यावरुनच तोच इम्प्रेस झाला होता. मग दोघेही मस्त गप्पा मारत होते.

पहिल्याच दिवशी  दोघांचे असे सूर जुळले की, रात्री दोन वाजेपर्यंत ते गप्पा मारत बसले होते. स्वप्निल आणि लीनाने पहिल्याच भेटीत एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. स्वप्निलने लीनाला एक अट घातली होती. त्याने म्हटलं होतं की तू लग्नानंतर माझ्या आई-वडिलांसोबत राहावं अशी माझी इच्छा आहे. मात्र स्वप्निल काही बोलण्याच्या आधीच लीनाने या गोष्टीला होकार दिला. मुलगी मायरा आणि मुलगा राघव अशी यांच्या मुलांची नावं आहेत. लग्नाच्या नऊ वर्षानंतरही दोघांमध्ये आज तितकंच प्रेम पाहायला मिळतं.

swwapnil joshi wishes wife leena joshi on their wedding anniversary  

loading image