Taapsee Pannu: इंदिरा गांधींच्या हत्येनंतर तापसी पन्नूच्या कुंटुबावर लोकांनी केलेला हल्ला.. काय होतं कनेक्शन..वाचा

तापसी पन्नूचा जन्म भले त्यावेळी झाला नव्हता पण घरच्यांकडून अंगाचा थरकाप उडवणारा तो प्रसंग ऐकल्यानंतर अभिनेत्रीच्या मनावर त्याचा खोलवर परिणाम झाला.
Taapsee Pannu
Taapsee PannuInstagram

Taapsee Pannu: 1984 साली जेव्हा दिल्लीमध्ये शीख लोकांच्या विरोधात दंगल छेडली गेली तेव्हा तापसीचा जन्म झाला नव्हता पण तिच्या कुटुंबाकडे मात्र खूप भीतीदायक,अंगाचा थरकाप उडवणाऱ्या त्या दंगलीच्या आठवणी आहेत.

तापसीनं एका हिंदी पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत या दंगलीविषयीच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. ती म्हणालीय, पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांच्या घरावर हल्ला करण्यासाठी तलवारी आणि पेट्रोल बॉम्ब घेऊन आलेल्या गर्दीनं जवळपास तिच्या कुटुंबियांना मारण्याचाच प्लॅन केला होता.(Taapsee Pannu family was attacked in 1984 anti sikh riots mob reached home with bombs and sword)

Taapsee Pannu
Payal Ghosh: अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या पायल घोषची सुसाइड नोट व्हायरल..गंभीर आरोप करत म्हणालीय..

तापसी पन्नूच्या आई-वडीलांचे तेव्हा लग्न नव्हते झाले. त्यावेळी तिची आई दिल्लीच्या पूर्व भागात सुरक्षित होती,तिच्या आई-वडीलांच्या घरी.

तापसीचे वडील आणि त्यांचे कुटुंब इतर चार हिंदु कुटुंबांसोबत दिल्लीत शक्ती नगरमधील एका इमारतीत रहात होते.

त्या कुटुंबांनीच तापसीच्या वडीलांना आणि त्यांच्या कुटुंबाला दंगलीत त्यांना मारायला आलेल्या त्या गर्दीपासून वाचवलं.

तापसी म्हणाली ,''त्या इमारतीत त्यांचे एकमेव शीख कुटुंब होतं आणि त्या विभागात प्रत्येकाला ते माहित होतं त्यामुळे आम्हाला शोधून काढणं जास्त कठीण नव्हतं''.

हेही वाचा: हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

Taapsee Pannu
Oscar 2023: रामचरण जिथे जाईल तिथे सोबत घेऊन जातो वॉल टेम्पल.. तुमचं मन जिंकेल यामागचं कारण..

जेव्हा दंगलखोर तापसीचे वडील राहत असलेल्या इमारतीच्या गल्लीत पोहोचली,तेव्हा त्यांचे ते हिंदू शेजारी तापसीच्या घराच्या दरवाजा बाहेर उभे राहिले आणि हल्ला करायला आलेल्या त्या गर्दीला सांगितलं की हे कुटुंब आधीच इथून पळून गेलं आहे.

रागावलेली गर्दी थोडीशी जाळपोळ करुन आल्या पावली परतली आणि त्यानंतर तापसीचं कुटुंब आपल्या शेजाऱ्यांच्या घरी सुरक्षेसाठी दडून बसलं.

ही घटना आपल्या घरच्यांकडून ऐकल्यानंतर तापसी आपल्यासोबत भीतीदायक काहीतरी घडलं आहे याचा सतत विचार करू लागली. आणि खूप कमी वयात तिनं या गोष्टीचा छडा लावला की ती अल्पसंख्यांक समुदायातून आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा तिच्या मनावरही खोलवर परिणाम झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com