Taapsee Pannu Video: तापसीचा नाद नाय! व्हिडिओ काढणाऱ्या पापराझींनाच मारले टोमणे!

 Taapsee Pannu Video
Taapsee Pannu VideoEsakal

बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू ही तिच्या दमदार अभिनयासाठी लोकप्रिय आहेत. तिने अनेक चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाने मनोरंजन विश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र तापसी तिच्या तापट स्वभावासाठीही ओळखली जाते. पापाराझी आणि तापसी यांच्यातील वाद हा कुणापासून लपलेला नाही. पापाराझी आणि तापसी यांच्यात नेहमीच खटके उडत असतात.

 Taapsee Pannu Video
Mission Raniganj: आधीच सिनेमा कमाईत अपयशी अन् त्यात..! अक्षयचा मिशन राणीगंज ऑनलाईन लीक झाल्याने मोठा फटका

तापसी अनेक वेळा पापाराझींना शिष्टाचार शिकवताना दिसते. असचं काही तरी यावेळीही झालं. पुन्हा एकदा पापाराझी आणि तापसीचा एक व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तापसी पुन्हा पापाराझींना टोमणे मारताना दिसत आहे.

 Taapsee Pannu Video
Bigg Boss 17: या अ‍ॅडल्ट कंटेंट क्रिएटरची होणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री; कोण आहे ती?

तापसी मुंबईत स्पॉट झाली. यादरम्यान अनेक पापाराझी आणि मीडियाच्या लोकांनी तिला घेरलं आणि त्यांनी तापसीला फोटोसाठी विनंती केल. मात्र तापसी थांबली नाही आणि आपल्या कारकडे वळू लागली. ती तिच्या कारकडे जात असताना पापाराझींना 'बाजूला सरका नाहीतर परत म्हणाल आम्हाला धक्का दिला.' त्यानंतर तापसी वारंवार म्हणाली, 'बाजूला सरका.'

तापसीने असं करणे ही पहिले वेळ नाही ती यापुर्वीही अनेक कार्यक्रमांमध्ये आणि अनेक प्रसंगी पत्रकार आणि पापाराझींवर भडकली आहे. तिचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. तिच्या वागण्यामुळे तिला अनेकदा ट्रोल केलं जातं. आताही तापसीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.

 Taapsee Pannu Video
Nushrratt Bharuccha : इस्राइलमध्ये युद्धाच्या भडक्यात अडकली नुसरत भरुचा; संपर्क होत नसल्याची टीमची माहिती

तापसी पन्नूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती , शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर तापसी पन्नू तामिळ चित्रपट 'एलियन'च्या मध्ये दिसले. यासोबतच ती 'वो लड़की हैं कहां' आणि 'फिर आयी हसीन दिलरुबा', 'जन गण मन' या चित्रपटातही काम करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com