तापसी पन्नूच्या प्रेमात पडलेली मुलगी, अभिनेत्रीनं शेअर केला मजेदार किस्सा Taapsee Pannu | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Taapsee Pannu REVEALS once a girl had hit on her in Goa; says, 'Felt nice about it...'

तापसी पन्नूच्या प्रेमात पडलेली मुलगी, अभिनेत्रीनं शेअर केला मजेदार किस्सा

बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू(Taapsee Pannu) सध्या आपल्या 'शाब्बास मिथू'(Shabbash Mithu) या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये भलतीच बिझी आहे. हा सिनेमा भारतीय क्रिकेटर मिताली राजचा बायोपिक आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तापसी पन्नूने सांगितलं की,एक मुलगी तिच्या मागे लागली होती. त्यावेळी तिला ते खूप आवडलं होतं कारण कुणी मुलगी आपल्याला इतकं पसंत करेल अशी कल्पना देखील आपण केली नव्हती.(Taapsee Pannu REVEALS once a girl had hit on her in Goa; says, 'Felt nice about it...')

हेही वाचा: 'मी पुन्हा येईन!' कसा झाला ४० आमदारांचा गेम? लवकरच उलगडणार रहस्य...

सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं आयोजित एका कार्यक्रमात मिताली आणि तापसी यांना विचारलं गेलं की,'कधी त्यांच्यासोबत काम करणाऱ्या किंवा कुणा इतर मुलीचं मन त्यांच्यावर जडलं होतं?' याचं उत्तर देताना तापसीनं एक इंट्रेस्टिंग किस्सा शेअर केला. तापसी म्हणाली,''माझ्या सोबत काम करणाऱ्या कुणा मुलीचं नाही पण ही तेव्हाची गोष्ट जेव्हा मी माझ्या मित्र-मैत्रिणींसोबत गोव्याला गेली होती. पहिल्यांदा मला याची जाणीव झाली नाही पण माझ्या फ्रेंड्सनी मला सांगितलं की एका मुलीचं मन माझ्यावर जडलं आहे''.

हेही वाचा: Viral Photo: हॉस्पिटलमध्ये सोनमच्या कुशीत चिमुकलं बाळ, अभिनेत्री आई बनली?

तापसी पन्नू पुढे म्हणाली,''मला त्यावेळी ही गोष्ट खूप आवडली होती. कारण एक मुलगी दुसऱ्या मुलीची कमजोर बाजू शोधताना दिसते,तिची प्रशंसा करता कमीच दिसते,प्रेम तर दूरच. त्यामुळे एक मुलगी आपल्याला एवढं पसंत करते ही जाणीवच खूप सुखावह होती''. याच प्रश्नावर मिताली म्हणाली,''एखादी मुलगी माझ्या प्रेमात पडली असेल असं झालं असेल बहुधा पण मला तसं कधी जाणवलं नाही''.

हेही वाचा: 'कोणी कोणाला फसवलं?', शमितासोबत ब्रेकअपच्या प्रश्नांवर राकेश बापटचं उत्तर

Shabbash Mithu चे दिग्दर्शन श्रीजित मुखर्जी यांनी केलं आहे. ज्यात तापसी पन्नूसोबत विजय राज मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा १५ जुलै रोजी सिनेमागृहात प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमाव्यतिरिक्त तापसी अनुराग कश्यपचा सिनेमा 'दोबारा' आणि राजकुमार हिरानींच्या 'डंकी' सिनेमात शाहरुख खानसोबत दिसणार आहे.

Web Title: Taapsee Pannu Reveals Once A Girl Had Hit On Her In Goa Says Felt Nice About

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top