Tarak Mehta Birth Anniversary: मालिके मागचे खरे 'तारक मेहता' कोण हे माहितीय? वाचा सविस्तर

लेखक, नाटककार आणि आपल्याला उलटा चश्मा दाखवणाऱ्या तारक मेहता यांच्याविषयी सविस्तर..
taarak mehta birth anniversary who is real taarak mehta behind the taarak mehta ka ooltah chashmah serial
taarak mehta birth anniversary who is real taarak mehta behind the taarak mehta ka ooltah chashmah serialsakal

taarak mehta: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही प्रचंड लोकप्रिय मालिका आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच वर्ग या शोचा चाहता आहे. गेली पंधरा वर्षे ही मालिका आपले मनोरंजन करत आहे. घराघरात आणि मनमनात घर करून राहिलेल्या या मालिकेचे नाव 'तारक मेहता' असते तरी समाजाचा हा उलटा चश्मा आपल्याला दाखवाणारे मालिकेमागचे खरे तारक मेहता कुणी दुसरेच आहे. ते म्हणजे लेखक 'तारक मेहता'. त्यांची आज जयंती.. त्या निमित्ताने जाणून घेऊया नेमके तारक मेहता होते कोण..

(taarak mehta birth anniversary who is real taarak mehta behind the taarak mehta ka ooltah chashmah serial)

taarak mehta birth anniversary who is real taarak mehta behind the taarak mehta ka ooltah chashmah serial
Raju Srivastav: राजू श्रीवास्तव यांची पत्नी राजकारणात? म्हणाल्या.. त्यांची अपुरी इच्छा..

गुजराती भाषेतील एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लेखक म्हणजे तारक मेहता. नाटक, मालिका, स्तंभलेखन, कथा अशा साहित्याच्या विविध माध्यमात चौफेश मुशाफिरी करून त्यांनी 2017 साली या जगाचा निरोप घेतला. ते आज आपल्यात नसले तरी त्यांची 'तारक मेहता का उलटा चश्मा' ही मालिका जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांनी लिहिलेले 'दुनिया ने उंधा चष्मा' हे गुजराती भाषेतील सदर वाचकांना इतके भावले की त्याचीच पुढे मालिका करण्याचे ठरले आणि 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका घराघरात पोहोचली.

taarak mehta birth anniversary who is real taarak mehta behind the taarak mehta ka ooltah chashmah serial
Tunisha Sharma: तुनिषा शर्मा गरोदर होती का? बॉयफ्रेंड सोबतच्या संबंधांवर होतेय चर्चा..

तारक मेहता यांचा जन्म 26 डिसेंबर 1929 रोजी अहमदाबादमध्ये झाला. अहमदाबादमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबई गाठली. मुंबईतील खालसा महाविद्यालयातून त्यांनी गुजराती विषयात बी.ए केलं. त्यानंतर 1958 साली भवन्स महाविद्यालयातून एम.ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 

तारक मेहता यांच्या लोकप्रिय साहित्यात 'दुनियाने उंधा चष्मा' (1965), 'तारक मेहताना आठ एकांकियो' (1978), 'तारक मेहताना उंधा चष्मा' (1981), 'तारक मेहतानो टपुडो' (1982), 'तारक मेहतानी टोकळी परदेसना प्रवासे' (1985) यांचा समावेश करता येईल. नाटक, मालिका लेखन यासोबतच त्यांनी 80 पुस्तके लिहिली. त्यांची 'नवूं आकाश नवी धरती' आणि 'कोथळामांथी खिलाडी' ही पुस्तके विशेष गाजली. गुजराती साहित्य आणि नाट्य चळवळ यामध्ये त्यांचे भरीव योगदान होते. म्हणूनच तारक मेहता यांना 2015 साली 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com