'तारक मेहता..' फेम 'बबिता'चा ट्रान्सफॉर्मेशन लूक; चार महिन्यांत वजन केलं कमी | Munmun Dutta | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Munmun Dutta

'तारक मेहता..' फेम 'बबिता'चा ट्रान्सफॉर्मेशन लूक; चार महिन्यांत वजन केलं कमी

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'तारक मेहता का उल्टा चष्मा' Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेतील प्रत्येक कलाकार आपल्या दमदार अभिनयकौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेत बबिताची Babita भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता Munmun Dutta ही पडद्यावर जितकी ग्लॅमरस दाखवण्यात आली आहे, ती तितकीच खऱ्या आयुष्यात देखील बोल्ड आणि बिनधास्त आहे. मुनमुन सोशल मीडियावर सक्रिय असून इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतंच तिने तिच्या ट्रान्सफॉर्मेशनचा लूक सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. गेल्या चार महिन्यांपासून मुनमुन वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असून आता तिच्यातील बदल हा स्पष्ट दिसून येत आहे.

बबिताने पोस्ट केलेल्या या फोटोमधील डावीकडे तिचा आधीचा फोटो पहायला मिळतोय. तर उजवीकडे चार महिन्यांच्या वर्कआऊट आणि डाएटनंतर झालेला बदल दिसतोय. या फोटोसोबतच मुनमुनने तिने वजन कसं कमी केलं याविषयी सांगितलं. 'नियमित व्यायामासोबतच विशेष प्रकारचा डाएट फॉलो केल्याने माझ्या शरीरात सकारात्मक बदल झाले. चांगली गोष्ट म्हणजे चार महिने वर्कआऊट न केल्यानंतर आता मी नियमितपणे वर्कआऊट सुरू केलं आहे. आता माझ्या व्यग्र वेळापत्रकातूनही मी व्यायामासाठी आवर्जून वेळ काढते. परफेक्ट बॉडीसाठी अजून बराच प्रवास करायचा आहे', असं तिने लिहिलं आहे.

हेही वाचा: राजकुमारने गुडघ्यावर बसून पत्रलेखाला केलं प्रपोज; पहा साखरपुड्याचा Video

मुनमुनने नुकतंच मुंबईत स्वत:चं घर विकत घेतलं आहे. नव्या घरात राहायला गेल्यानंतर तिने फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली. मुनमुनचं युट्यूब चॅनल असून त्यावर ती विविध विषयांचे व्हिडीओ नेहमी पोस्ट करत असते. गेल्या काही दिवसांत मालिकेत टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनाडकत याला ती डेट करत असल्याच्याही जोरदार चर्चा होत्या.

loading image
go to top