Taarak Mehta: शैलेश लोढांची फसवणूक? अभिनेत्याच्या पोस्टनं निर्माते आले गोत्यात Sailesh Lodha | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'Taarak Mehta ka ooltah chashmah' fame sailesh lodha so angry takes dig at asit modi,post viral

Taarak Mehta: शैलेश लोढांची फसवणूक? अभिनेत्याच्या पोस्टनं निर्माते आले गोत्यात

Sailesh Lodha: प्रसिद्ध मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत गेल्या १४ वर्षांपासून तारक मेहता रंगवून लोकांना खळखळवून हसायला लावणारे शैलेश लोढा सध्या नाराज दिसतायत. त्यांच्या लेटेस्ट इन्स्टा पोस्टवरनं तरी असंच वाटत आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेचा आता शैलेश लोढा भाग राहिलेले नाहीत. निर्माते असित मोदी यांच्यासोबत झालेला त्यांचा वाद तर जगजाहीर आहे. म्हणूनच तर आजकाल जी पोस्ट ते करतायत त्याचं कनेक्शन थेट असित मोदींसोबत लावलं जात आहे.('Taarak Mehta ka ooltah chashmah' fame sailesh lodha so angry takes dig at asit modi,post viral)

Sailesh Lodha Post On Insta

Sailesh Lodha Post On Insta

शैलेश लोढा हरहुन्नरी अभिनेता असण्यासोबतच उत्तम कवी देखील आहेत. त्यांनी केलेली शायरी आणि कविता ते नेहमीच इन्स्टावर शेअर करत असतात. असं म्हणतात की कवीच्या भावना,त्याचा मूड त्यानं केलेलल्या कवितांमधून समजला जाऊ शकतो. आणि म्हणूनच शैलेश लोढा यांची पोस्ट त्यांची सध्याची मनःस्थिती दर्शवत आहे. असं बोललं जात आहे. त्यांच्या लेटेस्ट पोस्टमधून समोर येत आहे की ते नाराज आहेत. आता कोणावर नाराज आहेत हे थेट सांगता येणार नाही. पण पोस्ट वाचल्यावर अंदाज मात्र बांधला जाऊ शकतो की ते कोणत्या व्यक्तीवर नाराज आहेत. चला जाणून घेऊया शैलेश लोढांनी असं नेमकं आपल्या पोस्टमध्ये काय लिहिलं आहे.

हेही वाचा: 'स्वातंत्र्यवीर सावरकर' मधून मांजरेकरांचा काढता पाय, दिग्दर्शनासाठी नवीन नाव चर्चेत

शैलेश लोढा यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे जे आम्ही तसंच्या तसं इथे सांगतो,अनुवाद न करता. कारण पोस्ट हिंदीत आहे,जी बातमीतही जोडली आहे,आपल्याला थेट कळेलच. तर लोढांनी लिहिलं आहे,''सरल व्यक्ति के साथ किया गया छल आपकी बर्बादी के सभी द्वार खोल देता है. चाहे आप कितने भी बड़े शतरंज के खिलाड़ी क्यों ना हो...'' या चार ओळींसोबत शैलेश लोढा यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,''आज किंवा उद्या...देव सगळं पाहतोय''. शैलेश लोढांची ही पोस्ट पाहिल्यावर तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच उठला असेल की लोढा नेमके कोणावर एवढे रागात आहेत? ही पोस्ट अशी सहज कवीता सुचली म्हणून लिहिली गेली असं नक्कीच नाहीय,कारण सरळ-सरळ कळतंय या पोस्टमधून कोणावर तरी निशाणा साधला आहे.

हेही वाचा: मलायका म्हणजे नुसताच झगमगाट...

शैलेश लोढांनी भले या प्रश्नाचं उत्तर दिलं नसलं तरी लोकांनी मात्र अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. नेटकऱ्यांच्या मते, अभिनेत्यानं हा निशाणा तारक मेहता मालिकेचे निर्माते असित मोदींवर साधला आहे. कमेंट बॉक्समध्ये प्रत्येक जण असित मोदींचे नाव घेत आहे. तर काही लोकांनी शैलेश लोढांना मालिकेत परत आणण्याचा धोशा लावला आहे,कुणी निर्मात्यांना धमकीवजा इशारा दिला आहे.

अर्थात शैलेश लोढा आता तारक मेहता मध्ये परतणं शक्यच नाही कारण नवीन तारक मेहता बनून अभिनेता सचिन श्रॉफनं सूत्र हाती घेतली आहेत. शैलेश लोढांना सचिन श्रॉफनं रिप्लेस केलं आहे. आता सुरुवातीला लोकांना नवीन तारक मेहतांना स्विकारणं थोडं जड जाणार यात शंकाच नाही. कारण जुने 'तारक मेहता' यांचे चाहते आजही शैलेश लोढांनाच शो मध्ये शोधत आहेत.

Web Title: Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Fame Sailesh Lodha So Angry Takes Dig At Asit Modipost

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..