
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: मेगा भरती! ‘तारक मेहता..’ मालिका नव्या कलाकारांच्या शोधत..
taarak mehta: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही प्रचंड लोकप्रिय मालिका आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच वर्ग या शोचा चाहता आहे. गेली पंधरा वर्षे ही मालिका आपले मनोरंजन करत आहे. घराघरात आणि मनमनात घर करून राहिलेल्या या मालिकेचे गणित सध्या चांगलेच बिघडले आहे. अनेक कलाकारांनी या कार्यक्रमाला राम राम केला आहे, त्यामुळे या मालिकेचे निर्माते सध्या नव्या कलाकारांच्या शोधत आहेत.
हेही वाचा: Ved Box Office: रितेश-जेनिलिया मालामाल.. 'वेड'नं १३ दिवसात कमावले..
जवळपास पाच वर्षांआधी या (taarak mehta ka ooltah chashmah) मालिकेतील मुख्य अभिनेत्री दयाबेन म्हणजे दिशा वाकानी हिने ही मालिका सोडली, तेव्हा पासून मालिकेला लागलेली घरघर काही केल्या सावरली जात नाहीय. निर्मात्यांनी अनेकदा आश्वासन दिले, पण या मालिकेत दया बेन काही परतली नाही. नटू काका ही निधन पावले. त्या पाठोपाठ सोडी, रोशन तारक मेहता, अंजली भाभी अशा अनेक कलाकारांनी मालिका सोडली. त्यामुळे आता नवे कलाकार घेण्याशिवाय निर्मात्यांपूढे पर्याय उरला नाहीय.
हेही वाचा: Apurva Nemlekar: अण्णांची शेवंता दिसणार मांजरेकरांच्या चित्रपटात.. अपूर्वानेच सांगितली..
या परिस्थितीमुळे निर्मात्यांसमोर प्रेक्षकांना गुंतवून ठेवणे आणि मालिकेचा टीआरपी कोणत्याही प्रकारे वाचवणे हे सर्वांत मोठे आव्हान आहे. काही महिन्यांत अनेकांनी ही मालिका सोडली. त्यानंतर त्याच्या टीआरपीमध्ये लक्षणीय घट झाली आहे. पण गेल्या आठवड्यात या मालिकेने 'बावरी' ही पात्र पुन्हा आणले आणि पुन्हा एकदा टीआरपीच्या शर्यतीत टॉप १० शोमध्ये प्रवेश केला आहे. आता मालिकेमधून हरवलेल्या कलाकारांना लवकरात लवकर परत आणण्याचा निर्माते प्रयत्न करत आहेत.
गोकुळधाम सोसायटी पूर्ण व्हावी आणि संपूर्ण टीम एकत्रितपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकेल, असा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठी निर्माते नवीन कलाकारांना कास्ट करण्याचा विचार करत आहेत. मालिकेमध्ये दया बेनची मुख्य भूमिका करणारी अभिनेत्री दिशा वकानी, अंजली भाभी ऊर्फ नेहा मेहता, तारक मेहता यांची भूमिका साकारणारा शैलेश यांचाही या कलाकारांमध्ये समावेश आहे.
हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'
प्रत्येक जण मालिकेमधून बाहेर पडताना पाहून प्रेक्षकांना धक्काच बसला. अलीकडेच या मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदा यांनीही याला निरोप दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा मालिका पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.