श्रद्धा कपूरचा 'नागिन' लूक पाहून चाहते झाले अवाक

दिपाली राणे-म्हात्रे
Wednesday, 11 November 2020

श्रीदेवी यांच्या नंतर आता अभिनेत्री श्रद्धा कपूर ही भूमिका साकारणारे. नुकताच श्रद्धाचा नागिन लूक प्रेक्षकांसमोर आला आहे. 

मुंबई- दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा 'नगीना' हा सिनेमा प्रेक्षकांना माहित नाही असं होणारंच नाही.  या सिनेमात श्रीदेवी यांनी इच्छाधारी नागिणीची भूमिका साकारली होती. हा सिनेमा त्याकाळी प्रचंड गाजला होता. श्रीदेवी यांच्या नंतर आता अभिनेत्री श्रद्धा कपूर ही भूमिका साकारणारे. नुकताच श्रद्धाचा नागिन लूक प्रेक्षकांसमोर आला आहे. 

हे ही वाचा: ईशा केसकर आणि ऋषी सक्सेनाची लव्हस्टोरी,  ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर पाहिलं अन्...  

अभिनेत्री श्रद्धा कपूर नेहमीच वेगळं काहीना काही करण्याचा प्रयत्न करत असते. श्रद्धाचा नागिन लूक सध्या चर्चेचा विषय ठरलाय. आगामी सिनेमात ती नागिणीची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जातंय. श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन  नागिणच्या लूकमधील काही फोटो शेअर केलेत. श्रद्धाने शेअर केलेले हे फोटो तिच्या चाहत्यांनी खास तयार केल्याचं म्हटलं जातंय..

गेल्या अनेक दिवसांपासून श्रद्धा कपूर नागिणीची भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता श्रद्धाने नव्या लूकमधील फोटो शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिलाय. सुंदर आर्टवर्क आणि अप्रतिम एडिट केलेला हा फोटो शेअर करत आहे'', असं म्हणत श्रद्धाने हा फोटो शेअर केला आहे. श्रद्धाच्या या आगामी सिनेमाचं नाव अद्याप जाहीर झालेलं नाही. मात्र, दिग्दर्शक विशाल फुरिया या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.

हा आगामी प्रोजेक्ट तीन सिनेमांची सीरिज असेल. निखिल द्विवेदी या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. श्रद्धाला आता इच्छाधारी नागिनच्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.  

shraddha kapoor shares many avatars nagin fans flood her creative versions new age serpent 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shraddha kapoor shares many avatars nagin fans flood her creative versions new age serpent