तैमूरला आवडतोय बाबांचा टॅटू..

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

अभिनेत्री करीना कपूर तिचा आगामी चित्रपट "वीरे दी वेडिंग'च्या प्रमोशनमध्ये खूप बिझी आहे. तिचा लाडका तैमूर अली खान आतापासूनच सेलेब्रिटी बनलाय. त्याची झलक पाहण्यासाठी व त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी सर्व जण खूप उत्सुक असतात.

करिना कामात बिझी असते तेव्हा तैमूरला सैफ सांभाळतो आणि त्याच्याकडे तो खूप छान राहतो. या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी बेबोनं तैमूर व सैफच्या काही गोष्टी शेअर केल्या. तैमूरला सैफचा लेटेस्ट टॅटू खूप भावतोय. फक्त त्यालाच नाही तर करिनालाही खूप भावलाय. तिला सैफचा हा टॅटू रोमॅंटिक वाटतो. सैफनं करिनाच्या नावाचा टॅटू हातावर काढलाय. हा टॅटू तैमूर टक लावून पाहत असतो आणि त्याला हात लावतो. तेव्हा सैफ त्याला आवर्जून सांगतो, की हा मम्मीच्या नावाचा टॅटू आहे आणि त्या वेळी तैमूर गांभीर्यानं सैफकडे पाहत राहतो. कारण त्याला आपले वडील काय सांगताहेत ते काही कळत नसल्याचं करीना म्हणाली. इतकंच नाही; तर छोटा नवाब सैफकडून क्रिकेटचेही धडे गिरवतोय. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: taimur likes saif ali khan means his father s tattoo