Tamannaah Bhatia: डेटिंगच्या चर्चेदरम्यान तमन्ना भाटिया-विजय वर्मा पुन्हा एकत्र, सर्वांसमोर एकमेकांना... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tamannaah bhatia and vijay varma

Tamannaah Bhatia: डेटिंगच्या चर्चेदरम्यान तमन्ना भाटिया-विजय वर्मा पुन्हा एकत्र, सर्वांसमोर एकमेकांना...

बी-टाऊनमध्ये नवीन सेलेब्सची जोडी जमल्याचे अनेकदा पाहायला मिळते. सध्या बॉलिवूड आणि साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा यांचे नाव डेटिंगच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. विजय आणि तमन्ना न्यू सेलिब्रेशनमध्ये एकत्र दिसले होते. तेव्हापासून विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, आता तमन्ना आणि विजयचा आणखी एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे.

खरं तर, अलीकडेच तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा एले पुरस्कार सोहळ्यादरम्यान भेटले होते. या प्रसंगाचा एक लेटेस्ट व्हिडिओ इन्स्टंट बॉलीवूडने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तमन्ना भाटिया स्टायलिश ब्लू कलरच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे. त्याचवेळी विजय वर्मा फंकी लूकमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की तमन्ना भाटिया तिचे फोटोशूट करून घेत आहे, तेव्हा विजय वर्मा तिला मागून काहीतरी म्हणत जात आहे.

हेही वाचा: Bigg Boss 16: टीना दत्ताचा पत्ता कट तर कोणाला मिळणार 'टिकिट टू फिनाले'!

यानंतर दोघेही एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. एवढेच नाही तर नंतर दोघेही एकाच जागी फोटोशूट करताना दिसत आहे. अशा परिस्थितीत, तमन्ना भाटिया आणि विजय वर्माच्या या लेटेस्ट व्हिडिओने ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे दिसून येत आहे.

अलीकडेच तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी गोव्यात एकत्र नवीन वर्ष साजरे केले. यावेळी दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. एका व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला होता की, हे दोन कलाकार एकमेकांना किस करत आहेत. तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांचे नाव नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनवर व्हायरल झालेल्या किसिंग व्हिडिओमुळे डेटिंगच्या बातम्यांमुळे चर्चेत आले होते.