कोरोनावर मात केल्यानंतर तमन्ना भाटियाचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांना देतेय फिटनेस फंडा

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Saturday, 17 October 2020

आत्तापर्यंत अनेक सेलिब्रिटींना कोरोनाच्या संसर्गाचा सामना करावा लागला आहे. कित्येकांनी यावर मात करुन पुन्हा त्यांच्या आयुष्याला सुरुवात केली आहे. यापैकी एक आहे ती म्हणजे अभिनेत्री तमन्ना भाटिया जिने नुकतीच कोरोनावर मात केली आहे. 

मुंबई- कोरोना व्हायरसच्या संसर्गात सामान्स लोकांपासून ते कित्येक सेलिब्रिटी विळख्यात सापडले आहेत. यामध्ये बॉलीवूड सेलिब्रिटींचाही समावेश आहे. आत्तापर्यंत अनेक सेलिब्रिटींना कोरोनाच्या संसर्गाचा सामना करावा लागला आहे. कित्येकांनी यावर मात करुन पुन्हा त्यांच्या आयुष्याला सुरुवात केली आहे. यापैकी एक आहे ती म्हणजे अभिनेत्री तमन्ना भाटिया जिने नुकतीच कोरोनावर मात केली आहे. 

हे ही वाचा: मिथुन चक्रवर्तींचा मुलगा आणि पत्नी विरोधात एफआयआर दाखल, बलात्कार आणि जबरदस्ती गर्भपाताचा आरोप   

कोरोना व्हायरसवर मात केल्यानंतर तमन्ना भाटियाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी तमन्नाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर ती हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. मात्र कोरोनावर मात करत ती आता तिच्या घरी परतली आहे. घरी परतल्यानंतर तमन्ना वर्कआऊट करताना दिसून आली. या वर्कआऊटचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

तमन्ना भाटिया सोशल मिडियावर नेहमीच ऍक्टीव्ह असते. तिच्या चाहत्यांसाठी ती फोटो आणि व्हिडिओ शेअर करत तिचे अपडेट देत असते. तमन्ना भाटियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर वर्कआऊट व्हिडिओ पोस्ट केला आहे. सोबतंच चाहत्यांना देखील वर्कआऊट करण्याचा खास सल्ला दिला आहे. तिने हा व्हिडिओ पोस्ट करताना लिहिलंय, 'मला पुन्हा माझी ताकद कमवण्यासाठी लहान मुलासारखं हळूहळू पुढे जायला हवं.'

तिने पुढे लिहिलंय, 'कोरोना व्हायरसमधून बरं झाल्यानंतर हे महत्वपूर्ण पाऊल आहे. मात्र तेवढंच वर्कआऊट करा जितकं तुमचं शरिर सहन करु शकेल.' तमन्नाचा हा प्रेरणादायक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय. चाहते यावर कमेंट करत तिच्याकडून वर्कआऊट टिप्स घेत आहेत.   

tamannaah bhatia workout video after she won bettle against coronavirus goes viral  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tamannaah bhatia workout video after she won bettle against coronavirus goes viral