IMDb Rating : सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रेटींच्या यादीत तमन्ना '1' नंबर, शाहरुखलाही टाकलं मागे!

लस्ट स्टोरीज २ मध्ये तमन्नानं जे बोल्ड सीन दिले त्याची तिच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.
Tamannah Bhatiya Actress IMDb Rating
Tamannah Bhatiya Actress IMDb Rating esakal

Tamannah Bhatiya Actress IMDb Rating : लस्ट स्टोरीज २ मध्ये तमन्नानं जे बोल्ड सीन दिले त्याची तिच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. आपण कधीही किसिंग सीन देणार नाही असे म्हणणाऱ्या तमन्नानं तिचा बॉयफ्रेंड विजय वर्मासोबत केलेला रोमान्स मात्र लस्ट स्टोरीजला वेगळ्याच दिशेला घेऊन गेल्याचे दिसून आले. यासगळ्यात तमन्नाची आणखी एक वेगळी बातमी समोर आली आहे.

बाहुबलीमधून सर्वात प्रथम बॉलीवूडच्या प्रेक्षकांना तमन्नाविषयी कळले. त्यापूर्वी ती साऊथच्या काही चित्रपटांमधून झळकली होती. पण तिला हवे असणारे ग्लॅमर हे बाहुबली चित्रपटातून मिळाल्याचे दिसून आले. त्यानंतर तमन्नानं बॉलीवूडच्या काही चित्रपटांमध्येही कामं केली. काही दिवसांपूर्वी तिचा बबली नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यालाही चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

Also Read - Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

जी करदा आणि लस्ट स्टोरीज २ ने मात्र तमन्नाची मोठी क्रेझ तयार झाली आहे. यामुळे ती वेगवेगळ्या कारणामुळे बातमीतही राहिली आहे. नुकताच तिचा रजनीकांतसोबतच्या जेलर या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे. त्यात तिच्या डान्सची तुलना शकिराच्या डान्ससोबत करण्यात आली असून नेटकऱ्यांनी त्यावरुन तमन्नावर वेगवेगळे मीम्स देखीव व्हायरल केले आहेत. त्याची मोठ्या प्रमाणात चर्चाही आहे. यासगळ्यात तमन्नानं आणखी एक गोड बातमी दिली आहे.

Tamannah Bhatiya Actress IMDb Rating
'Sara Ali Khan'च्या मंदिरात जाण्याने पुन्हा रंगला वाद!

आयएमडीबीच्या सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रेटींमध्ये तमन्नानं बाजी मारली आहे. भारतातील सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रेटींच्या यादीत तमन्नानं चक्क बॉलीवूडचा किंग खान शाहरुखलाही मागे टाकले आहे. शाहरुख आता दुसऱ्या क्रमांकावर असून त्यानंतर मृणाल ठाकूर, कियारा अडवाणी, राम चरण, रणवीर सिंह आणि थलापती विजय सहित आणखी काही अभिनेत्यांना तिनं मागे टाकलं आहे.

Tamannah Bhatiya Actress IMDb Rating
Kangana Ranaut: 'माझं ऐका, आता चुकूनही हिमालयाच्या वाट्याला जाऊ नका'! कारण...

तमन्नाच्या या गोड बातमीनं तिचे चाहत्यांना कमालीचा आनंद झाला आहे. त्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळया चित्रपट आणि मालिकांमधून दिसणाऱ्या तमन्नानं तिच्या अभिनयानं चाहत्यांना त्या बातमीनं सुखद धक्का दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com