तामिळ कॉमेडियन नेल्लई शिवा यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actor nellai siva

तामिळ कॉमेडियन नेल्लई शिवा यांचे निधन

मुंबई - कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतो आहे. त्याचा परिणाम दिसून आला आहे. सिनेसृष्टीतही कोरोनाचा परिणाम पाहायला मिळाला आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रेटींना आपला जीव गमवावा लागला आहे. केवळ कोरोनाच नाही तर हदयविकाराच्या विकारानं निधन झालेल्या सेलिब्रेटींची संख्या वाढते आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द कॉमेडियन नेल्लई शिवा (tamil comedian actor nellai siva ) यांचे हदयविकारानं निधन झालं आहे. ते ६९ वर्षांचे होते. तिरुनवेली येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

नेल्लई शिवा (tamil comedian actor nellai siva ) तिरुनवेली येथील पानाकुडी येथे त्यांचे घर होते. त्यांना त्याठिकाणीच हदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचा मृत्यु झाला. ते अविवाहीत होते. नेल्लई यांच्या जाण्यानं तामिळ चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियावर श्रध्दांजली वाहिली आहे.

हेही वाचा: 'माझ्या वडिलांना वाचवता आलं असतं'; संभावना सेठने व्यक्त केलं दु:ख

हेही वाचा: मराठी अभिनेत्याची एक्स्प्रेस वेवर लूट; ५० हजार रुपये घेऊन आरोपी पसार

शिवा यांनी आन पावम या चित्रपटाच्या माध्यमातून तमिळ चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला होता. त्या चित्रपटाचे दिग्दर्शन पांडियाराजन यांनी केले होते. त्यानंतर अंबे शिवम, महाप्रभु, वेत्री कोडी कट्टू आणि कन्नुम सारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. त्यांनी ५०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. कॉलीवूडमध्ये (kollywood) त्यांच्या नावाचा मोठा दबदबा होता. ते त्यांच्या स्लँगसाठी प्रसिध्द होते.

Web Title: Tamil Comedian Actor Nellai Siva Passed Away At

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :tamil actornellai shiva
go to top