Ajith Kumar Cheating Row: 'माझ्याकडून पैसे घेऊन त्यानं...', निर्मात्यानं केला तामिळ सुपरस्टारवर गंभीर आरोप

Ajith Kumar Cheating Row:
Ajith Kumar Cheating Row: Esakal

Ajith Kumar Cheating Row: तामिळ चित्रपट सुपरस्टार अजिथ कुमार हा त्याच्या अॅक्शन चित्रपटासाठी खुप लोकप्रिय आहे. त्याचे चाहते केवळ साउथमध्येच नाही तर जगभर पसरले आहेत. त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत राहणारा अजिथ आज वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे.

अजिथवर एका निर्मात्याने फसवणूक केल्याचा गंभीर आरोप लावला आहे. अनेक तमिळ चित्रपटांची निर्मिती केलेल्या मणिकम नारायणन यांनी अजिथवर हा आरोप केला आहे.

त्यांनी दावा केला आहे की अजिथने त्यांच्याकडून पैसे घेतले होते मात्र नंतर त्याने ते परत केले नाहीत. अजिथने तो त्याच्या चित्रपटात काम करुन आणि पैसे परत करेन असं आश्वासन दिलं होतं. मात्र अजिथने तसं काहीही केलं नाही. मणिकम नारायणन यांच्यासोबत एकत्र कामही केलं नाही.

Ajith Kumar Cheating Row:
Jawan: जवानमध्ये दीपिका बनणार शाहरुखची आई! प्रिव्ह्यू पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी लावले शोध..

माध्यमांशी बोलतांना निर्मात्यांन सांगितले की, अनेक वर्षांपूर्वी अजितने त्याच्याकडून पैसे उसने घेतले होते. कारण त्याला त्याच्या आई-वडिलांना मलेशियाला व्हॅकेशनवर पाठवायचं होतं. त्यानंतर तो त्याच्या चित्रपटात काम करणार असंही सांगितलं.

याकामाद्वारे तो घेतलेले पैसे परत करेल असंही त्यानं निर्मात्यांला सांगतिलं होतं. मात्र आत्तापर्यंत ना अजितने त्याला पैसेही दिले, ना चित्रपटात काम केलं .

Ajith Kumar Cheating Row:
Prasad Oak Vadapao: प्रसाद ओक लंडनमध्ये बनवणार गोड - तिखट 'वडापाव', काय आहे प्रकरण जाणुन घ्या

त्याचबरोबर निर्मात्यांने सांगतिल की, त्याने याबद्दल इतक्या वर्षांत एकदाही बोलून दाखवलेलं नाही. त्याचा परिवार खुप चांगला आहे.

त्याचबरोबर अजिथ एका चित्रपटातुन तब्बव 50 कोटींपेक्षाही जास्त कमाई करतो. त्याला लोकांची फसवणूक करण्याची काय गरज आहे?

निर्मात्याने यापुर्वीही या मुद्यावर बऱ्याचदा वक्तव्य केलं आहे. मात्र मणिकम नारायणन आणि अजिथचा वाद अजूनही सुटलेला नाही.

Ajith Kumar Cheating Row:
Roadies 19: रोडीज 19 मध्ये स्पर्धक नाही तर जजच भिडले! चालू शोमध्ये केली हाणीमारी..

काही दिवसांपुर्वी किच्चा सुदीपवरही त्यांनी फसवणुकीचा आरोप केला आहे. निर्माता एमएन कुमार यांनी त्याच्यावर 10 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. 9 कोटी रुपये घेऊनही अभिनेत्याने आपला चित्रपट केला नसल्याचं निर्मात्याने सांगितले.

अजिथ सध्या त्याच्या पुढच्या ' 'विदा मुयार्ची'' या चित्रपटात व्यस्त आहे. चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन सुरू झाले आहे. हा एक अॅक्शन एंटरटेनर असेल असे सांगितले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com