Me Too : 'मी टू' बद्दल तनुश्री बोलणार हार्वर्ड विद्यापीठात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

या परिषदेत 'मी टू' मोहीम, तिचा आतापर्यंतचा प्रवास, स्त्रीयांवर होणारे अत्याचार अशा विषयांवर ती बोलणार आहे.

मुंबई : 'मी टू' मोहीम सुरु करुन अभिनेत्री तनुश्री दत्ताने बॉलिवूडमधील लैंगिक अत्याचार आणि गैरवर्तनाविरोधात आवाज उठवण्याला आरंभ केला. या मोहिमेअंतर्गत तनुश्रीला हार्वर्ड विद्यापीठाकडून खास आमंत्रण आले आहे. या महिन्यात होणाऱ्या हार्वर्ड विद्यापीठाच्या भारतीय परिषदेत ती प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित राहणार आहे. 

आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून 'मी टू' मोहीमेद्वारे तनुश्रीने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर असभ्य वर्तवणूकीचे आरोप केले होते. यानंतरच अनेक महिलांनी पुढे येऊन चंदेरी दुनियेचे वास्तव समोर आणले.

तनुश्रीने सोशल मिडीयावरुन याविषयी माहिती दिली. या परिषदेत 'मी टू' मोहीम, तिचा आतापर्यंतचा प्रवास, स्त्रीयांवर होणारे अत्याचार अशा विषयांवर ती बोलणार आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात तनुश्रीने पाटेकर व कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यावर असभ्य वर्तवणूकीचे आरोप केले होते. तनुश्रीला पाठिंबा देण्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकार पुढे आले, तर बऱ्याच जणांनी तिच्यावर टिकास्त्रही सोडले. तनुश्रीनंतर अनेक महिलांनी बॉलिवूडमध्ये बड्या दिग्दर्शकांचे, कलाकारांचे खरे चेहरे समोर आणले. यात साजिद खान, आलोक नाथ, विकास बहल या नावांचा प्रामुख्याने समावेश होता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tanushree Dutta Invited To Speak on Me Too At Harvard University