तापसी पन्नू आणि रेणुका शहाणेची वीजकंपनीवर आगपाखड; जादा बील आकारल्याने टिवटीवाट

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 29 जून 2020

अभिनेत्री तापसी पन्नू हिचे घर जून महिन्यात बंद असतानाही तिला छत्तीस हजार रुपये वीजबिल आल्यामुळे तिने ट्विटरवर तक्रार नोंदवली आहे. याबाबत मीटर रिडींग घेतल्यावर नवे बिल योग्य आहे, असे स्पष्टीकरण अदानी इलेक्ट्रिसिटी ने दिले आहे.

 

मुंबई : अभिनेत्री तापसी पन्नू हिचे घर जून महिन्यात बंद असतानाही तिला छत्तीस हजार रुपये वीजबिल आल्यामुळे तिने ट्विटरवर तक्रार नोंदवली आहे. याबाबत मीटर रिडींग घेतल्यावर नवे बिल योग्य आहे, असे स्पष्टीकरण अदानी इलेक्ट्रिसिटी ने दिले आहे.

 मनोरंजन विश्वातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गेले दोन-तीन महिने टाळेबंदी असल्यामुळे अनेकांचे व्यवसाय उद्योग बंद होते. तसेच सामान्य ग्राहकांचेही मिटर रिडींग घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे अनेकांचे सरासरी बिल जादा आल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या. त्यातच अभिनेत्री पन्नू तापसी हिनेही अशीच तक्रार ट्विटरद्वारे केली होती. तिला एप्रिल महिन्यात चार हजार 390 तर मे महिन्यात तीन हजार 850 रुपये बिल आले होते. मात्र घर बंद असूनही तिच्या जून महिन्याच्या वापराचे बिल 36 हजार रुपये आल्यामुळे तिला धक्काच बसला. कारण जून मध्ये तिचे घर बंद होते. मात्र प्रत्यक्ष मिटर रिडींग केल्यावर नवे बिल योग्य आहे, असे स्पष्टीकरण अदानी इलेक्ट्रिसिटी ने केले आहे.

अभिनेते नाना पाटेकर यांनी घेतली सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांची भेट

तापसी बरोबरच अभिनेत्री रेणुका शहाणे यांनाही एप्रिल महिन्याचे बिल 5510 तर मे आणि जून महिन्याचे एकत्रित बिल 29,700 असे आले असून फक्त मे महिन्यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटीने त्यांना 18,080 रुपये आकारले आहेत असे सांगत रेणुका यांनी ट्विटरवर फोटो टाकत नाराजी व्यक्त केली आहे.

याप्रमाणेच विनोदवीर वीर दास आणि दिनो मोरीया यांनीही ट्विट करत अदानी एलेक्ट्रिसिटी विरोधात नाराजीचा सूर लावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tapsi Pannu and Renuka Shahane to power companies