'संगीत देवबाभळी' पाहायला चक्क जेठालालची हजेरी, नाटक पाहून म्हणाला.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 tarak mehta ka ooltah chashma fame actor dilip joshi feeling happy and amazed after watching sangeet devbabhali marathi drama writer prajakt deshmukh bhadrakali production

'संगीत देवबाभळी' पाहायला चक्क जेठालालची हजेरी, नाटक पाहून म्हणाला..

sangeet devbabhali : गेल्या काही वर्षात व्यावसायिक रंगभूमीवर आलेले 'संगीत देवबाभळी' हे नाटक रोज नवा विक्रम रचत आहे. या नाटकाने नाट्य स्पर्धांमध्ये तर बाजी मारलीच शिवाय काही दिवसांपूर्वीच 'साहित्य अकादमी' पुरस्कार या नाटकाला प्राप्त झाला. विशेष म्हणजे हे नाटक मुंबई विद्यापीठाच्या 'बीए' अभ्यासक्रमातही समाविष्ट करण्यात आले आहे. विजया मेहता, स्व. जयंत पवार , डॅा. राजीव नाईक, सतीश आळेकर, नसिरुद्दीन शाह, परेश रावल, दिलीप प्रभावळकरअशा अनेक दिग्गजांनी या नाटकाला गौरवले आहे. आता हिंदी आणि गुजराती मधील दिग्गज नट अभिनेते दिलीप जोशी म्हणजेच 'तारक मेहता उलटा चश्मा' मालिकेतील सर्वांचे लाडके जेठालाल यांनाही 'संगीत देवबाभळी'ला हजेरी लावली. यावेळी नाटक पाहून ते अक्षरशः भारावून गेले. ( tarak mehta ka ooltah chashma fame actor dilip joshi feeling happy and amazed after watching sangeet devbabhali marathi drama writer prajakt deshmukh bhadrakali production)

गेली १४ वर्षे निखळ मनोरंजन करणारी आणि घराघरात पोहोचलेली मालिका म्हणजेच 'तारक मेहता उलटा चश्मा'. या मालिकेतील प्रत्येक कलाकार आपल्याला आपल्या घरातला वाटू लागला आहे. त्यापैकीच एक म्हणजे 'जेठालाल'. हे पात्र साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांनी हिंदी आणि गुजराती भाषेत अनेक भूमिका केल्या आहेत. ते स्वतः एक रंगकर्मी असून गुजराती रंगभूमीवर त्यांचे भरीव योगदान आहे. सध्या सर्वत्र 'संगीत देवबाभळी'ची चर्चा असल्याने दिलीप जोशी यांनाही संगीत देवबाभळी पाहण्याचा मोह आवरला नाही. नुकत्याच झालेल्या एका प्रयोगाला ते उपस्थित होत. यावेळी 'संगीत देवबाभळी' पाहून ते अवाक झाले.

दिलीप जोशी म्हणाले, 'या नाटकाविषयी गेली बरीच दिवस ऐकून होतो आणि पाहण्याची इच्छा होती. हे नाटक पाहून मी थक्क झालो आहे, माझ्याकडे शब्द नाहीत. हा एक उत्तम रंगमंचीय अविष्कार आहे, म्हणजे लाईट, साउंड, दिग्दर्शन, सेट सगळ्याच बाबतीत. नाटक सुरु झाल्यापासून ते आपल्याला भावविवश करते. एकदा पाहून पोट भरणार नाही. प्राजक्त, मानसी, शुभांगी सगळेच कमाल आहेत. रखुमाई आणि अवलीला ज्या पद्धतीने लोकांसमोर आणले आहे ते सर्वांनी नक्कीच बघायला हवे.'

'भंडाऱ्याच्या डोंगरावर संत तुकोबांना भाकरी द्यायला गेलेली नि काटा रूतून बेशुद्ध झालेली आवली आणि तिला लखुबाई बनून घरी घेऊन येणारी साक्षात रखुमाई यांच्यातील अनोख्या संवादातून लौकिक अलौकिक नात्याची वीण प्राजक्त देशमुख यांनी या नाटकात रेखटली आहे. देवत्व लाभलेल्या राखुमाईला आवलीच्या माध्यमातून आलेले लौकिक भान आणि संसारी आवलीच्या साध्या प्रश्नांनी गाठलेली अलौकिक पातळी या नाटकाचा केंद्रबिंदू आहे. या नाटकात अभिनेत्री मानसी जोशी हिने राखुमाईची तर अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिने आवलीची भूमिका साकारली आहे. प्रसाद कांबळी यांच्या 'भद्रकाली प्रॉडक्शन'ने हे नाटक रंगभूमीवर आणले आहे.

Web Title: Tarak Mehta Ka Ooltah Chashma Fame Actor Dilip Joshi Feeling Happy And Amazed After Watching Sangeet Devbabhali Marathi Drama Writer Prajakt Deshmukh Bhadrakali Production

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..