तारक मेहताच्या बबिताचा 'जुगनू' डान्स, फॅन्स म्हणाले तु तर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तारक मेहताच्या बबिताचा 'जुगनू' डान्स, फॅन्स म्हणाले तु तर...
तारक मेहताच्या बबिताचा 'जुगनू' डान्स, फॅन्स म्हणाले तु तर...

तारक मेहताच्या बबिताचा 'जुगनू' डान्स, फॅन्स म्हणाले तु तर...

मुंबई - टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय मालिका म्हणून तारक मेहताचे नाव घेतले जाते. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ या मालिकेनं चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. त्या मालिकेमध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या अभिनेत्यांनी चाहत्यांना जिंकून घेतले आहे. आतापर्यत सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणून तारक मेहताला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. सध्या या मालिकेतील प्रेक्षकांची आवडती बबिता चर्चेत आहे. ती आणि टप्पु अर्थात राज अनादकत यांच्या अफेयरची चर्चा जोरदार रंगली आहे. यापूर्वी बबिता म्हणजे मुनमुन दत्तानं त्याच्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेयरही केले होते. त्यावरुन चाहत्यांनी असा अंदाज बांधला आहे की, ते एकमेकांना डेट करत आहे. आता बबितानं तिच्या डान्सचा व्हिडिओ शेयर केला आहे.

तारक मेहतामधून मुनमुन दत्ताला मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली आहे. तिनं या मालिकेतून प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असणाऱ्या मुनमुनच्या जुगनू गाण्याच्या व्हिडिओला आतापर्यत तीन लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. त्यावरुन तिच्या लोकप्रियतेचा अंदाज येईल. मुनमुन तिचे वेगवेगळ्या प्रकारचे फोटोही शेयर करत असते. त्यालाही चाहत्यांनी कमेंट दिल्या आहेत. आता मुनमुननं जो व्हिडिओ शेयर केला आहे त्यामध्ये ती बादशाहच्या जुगनू या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. त्या गाण्यामध्ये आपण पाहू शकतो की, मुनमुन त्या गाण्याच्या ज्या ट्रेडिंग स्टेप आहे त्या करताना दिसत आहे.

काही तासांपूर्वी शेयर केलेल्या त्या व्हिडिओला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्या व्हिडिओला कॅप्शन देताना मुनमुननं जुगनू फिव्हर असं लिहिलं आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अशी माहिती होती की, मुनमुन दत्ता ही तिचा सहकलाकार राज अनादकटला डेट करत आहे. जो तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये टप्पुची भूमिका करतो. त्या दोघांचे मोठ्या प्रमाणात मीम्सही व्हायरल झाले होते. त्यावर मुनमुननं प्रतिक्रिया दिली होती. तिनं अशाप्रकारे मीम्स व्हायरल करणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली होती.

हेही वाचा: तिसऱ्या लग्नासाठी आमिर खान तयार; कोण आहे ती अभिनेत्री?

loading image
go to top