तिसऱ्या लग्नासाठी आमिर खान तयार; कोण आहे ती अभिनेत्री? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिसऱ्या लग्नासाठी आमिर खान तयार; कोण आहे ती अभिनेत्री?
तिसऱ्या लग्नासाठी आमिर खान तयार; कोण आहे ती अभिनेत्री?

तिसऱ्या लग्नासाठी आमिर खान तयार; कोण आहे ती अभिनेत्री?

sakal_logo
By
टीम इ सकाळ

मुंबई - बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ज्या अभिनेत्याची ओळख आहे अशा आमीर खानचा केवळ भारतातच नाही तर जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. हॉलीवूडमध्येही त्याच्या अभिनयाची क्रेझ आहे. आमिर हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलेला अभिनेता आहे. काही महिन्यांपूर्वी त्यानं त्याच्या दुसऱ्या पत्नीला किरण रावला घटस्फोट दिला होता. त्यावरुन त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती. त्यानंतर त्याच्या तिसऱ्या लग्नाची तयारी सुरु झाल्याचे बोलले जात आहे. त्यानं नेमक्या कोणत्या अभिनेत्री सोबत लग्न करायचे म्हणून किरण रावला घटस्फोट दिला? असा प्रश्न त्याला चाहते आता विचारु लागले आहे. किरण आणि आमिर हे परस्पर संमतीनं एकमेकांपासून विभक्त झाले होते. त्यावर आमिरनं आमच्यात तसं ठरलं होतं. याविषयी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

सध्या बॉलीवूडमध्ये लग्नाचा सीझन सुरु झाला आहे. असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचं लग्न झालं. त्यानंतर अभिनेता विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या लग्नाची चर्चा सुरु झाली. दुसरीकडे आलिया आणि रणवीर हे देखील लग्नाच्या तयारीला लागले आहेत. अशावेळी आमिर खाननं देखील आपल्या तिसऱ्या लग्नाच्या तयारीला सुरुवात केल्याचे म्हटले जात आहे. अद्याप त्याच्याकडून अधिकृतपणे याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नसली तरी त्याच्याबाबत सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. यापूर्वी आमिरनं मी आणि किरण आता पती पत्नी नसल्याचे सांगत सर्वांना धक्का दिला होता.

सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की, आमिर आता तिसऱ्या लग्नाची तयारी करतो आहे. असंही म्हटलं जातंय की, तो त्याची अपकमिंग फिल्म लाल सिंह चढ्ढा रिलिज झाल्यानंतर आपल्या लग्नाची अधिकृत घोषणा करणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो त्याच्या सहकलाकार अभिनेत्रीशी लग्न करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. बऱ्याच दिवसांपासून आमिर आणि फातिमा सना शेख यांच्या नावाची चर्चा आहे. तिलाही आमिरच्या नावावरुन ट्रोल करण्यात आले होते. अद्याप तिनं त्या नात्याविषयी कोणताही खुलासा केला नसला तरी त्यांना अनेकदा एकत्रित स्पॉट करण्यात आले आहे. आमिरनं 1987 मध्ये रिना दत्ताशी लग्न केलं होतं. त्यानंतर 2002 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मग पुन्हा आमिरनं किरण रावसोबत संसार सुरु केला होता.

हेही वाचा: Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'

हेही वाचा: दारुचा ग्लास डोक्यावर ठेवला, म्हणते, 'मला माझ्या पप्पांनी'....

loading image
go to top