'अब जंग होगी..', तारक मेहता फेम Shailesh Lodhaनं असित मोदी विरोधात फुंकल रणशिंग?

Shailesh Lodha
Shailesh LodhaEsakal

टिव्हि विश्वातील सर्वात लोकप्रिय शो तारक मेहता का उल्टा चष्मा हा सुरवातीला त्याच्या मालिकेतील पात्रांमुळे आणि त्याच्या गमतीदार भागांमुळे चर्चेत असायचा. हा शो गेल्या अनेक वर्षापासून लोकांचे मनोरंजन करत आहे आणि अजूनही करत आहे. मात्र या शोच्या कलाकारांना गळती लागल्याचं दिसतयं. अनेक कलाकार हा शो सोडून गेले आहेत.

सध्या हा शो अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. त्यातच तारक मेहताची भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढा यांनी शो सोडल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले. शोचे निर्माते असित कुमार मोदी यांच्याशी त्यांचा वाद झाल्याचे सांगण्यात आले. यानंतर दोघांमध्ये शाब्दिक युद्धही झालं आहे. त्या

Shailesh Lodha
Satish Kaushik: सतीश कौशिक यांचा मृत्यू की घातपात? दिल्ली पोलिसांना सापडली औषधे

दरम्यान, शैलेश लोढा यांची एक नवीन पोस्ट समोर आली आहे ज्यात त्यांनी कोणाचेही नाव न घेता अप्रत्यक्षपणे टोमणा मारला आहे. मात्र नेटकऱ्यांनी ही पोस्ट पोहिल्यानंतर त्याचा संबध असित मोदी यांच्याशी जोडला आहे.

Shailesh Lodha
Walt Disney: अ‍ॅनिमेशनच्या दुनियेचा बादशाह! 'या' व्यक्तीने जिंकले तब्बल 26 वेळा ऑस्कर..

शैलेश लोढा यांनी अलीकडेच त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून फोटो शेअर केला आहे. या फोटोवर त्यांनी कॅप्शनमध्ये दोन ओळी लिहिल्या आहेत, ''दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत, ये एक चिराग, कई आंधियों पर भारी है....वसीम साहब का ये शेर बिल्कुल मुफीद है क्यों कि "अब जंग तो होगी"....''

Shailesh Lodha
TJMM Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'तू झुठी मैं मक्कार'ची पकड कायम, चित्रपटाने तिसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

एका यूजरने म्हटलं आहे की, हे सर असित मोदीजींविरुद्धचं युद्ध आहे. त्याचवेळी एकानं नाव न घेता अशी टोमणा मारणे योग्य नाही, असा सल्ला दिला. तर काही चाहत्यांनी शैलेश लोढा यांनातारक मेहता का उल्टा चष्मा या शोमध्ये पुनरागमन करण्याची मागणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com