TDM Movie: बहिणीचं लग्न ए? मग हे गाणं ऐकाच.. यंदा लग्नसराईत वाजणार 'बकुळा'.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

TDM marathi movie song bakula released

TDM Movie: बहिणीचं लग्न ए? मग हे गाणं ऐकाच.. यंदा लग्नसराईत वाजणार 'बकुळा'..

marathi movie: लग्नसराई म्हटलं की लगीनगीतांशिवाय शोभा येतच नाही. लगीनगीतांचा पॅटर्न हा हळदीचा, वरातीच्या गाण्यांचा असला तरी माहेरहुन सासरी जाणाऱ्या मुलीसाठी आई, वडील, बहीण, भाऊ यांची होणारी घुटमळ सांगणाऱ्या गाण्यांची पण एक वेगळीच परंपरा आहे. याच परंपरेतील प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणणारं 'टीडीएम' चित्रपटातील 'बकुळा' हे गाणं नुकतच समोर आलं आहे.

(TDM marathi movie song bakula released )

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: मी नाय त्यातली, कडी लाव आतली.. तेजस्विनी-अपूर्वामध्ये खडाजंगी..

'बकुळा' या गाण्यात लग्नातील धमाल-मस्ती सोबतच नववधूच्या मनातील हुरहुर, जोडीदाराची ओढ तसेच लग्नाचा माहोल, पाहुण्यांची लगबग आणि आई, वडील आणि भावाच्या मनातील घुटमळ याचे उत्तम वर्णन या गाण्यातून व्यक्त करण्यात आले आहे.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हेही वाचा: Salim Khan Birthday: पत्नी, चार मुलं, घरातून विरोध असतानाही हेलनच्या प्रेमात वेडे होते सलीम खान..

डॉ. विनायक पवार यांनी लिहिलेल्या या गीताला नंदेश उमप, प्रियांका बर्वे आणि ओंकारस्वरूप बागडे यांनी आपल्या मधुर स्वरांनी चारचाँद लावले आहेत. तर हे गाणे ओंकारस्वरूप बागडे आणि वैभव शिरोळे यांनी संगीतबद्ध केले आहे. 'बकुळा' या गाणयातून अलवार नाते गोंजारले जात असून नंदेश उमप यांनी अगदी जीव ओतून हे गाणे स्वरबद्ध केले आहे यांत शंकाच नाही. हृदयस्पर्शी असे या गीताचे बोल सर्वसामान्य माणसांच्या मनाला चटका लावून जाणारे आहे.

'चित्राक्ष फिल्म्स' आणि स्माईल स्टोन स्टुडिओ' प्रस्तुत 'टीडीएम' या आशयघन चित्रपटाच्या निर्मितीची धुरा दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी पेलवली असून चित्रपटाची कथा, संवाद, स्क्रीनप्लेची जबाबदारी बी. देवकाते आणि भाऊरावांनी सांभाळली आहे. या चित्रपटाच्या संगीताची बाजू वैभव शिरोळे आणि ओंकारस्वरूप बागडे यांनी पाहिली. ३ फेब्रुवारी २०२३ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :Marathi Movies