आयुष्मान खुरानाच्या 'बाला' चित्रपटाचा टीझर रिलीज

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 August 2019

- आयुष्मान खुरानाच्या आगामी 'बाला' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. 
- येत्या १२ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
- सा टीझरमध्ये आयुष्मान
ने साधलेल वेगळेपण मनाला सुखावणारं.

आयुष्मान खुरानाची चर्चा सर्वत्र चालु असताना, नुकताच त्याच्या आगामी 'बाला' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. नेहमी काहीतरी वेगळ प्रेक्षकांसाठी आणणारा आयुष्मान यावेळीही, प्रेक्षकाना त्याच्या अभिनयाने, कथेच्या निवडीतील वेगळेपणाने चकित करणार यात वाद नाही. बालाच्या टीझर मधुनच आपल्याला ह्याही पात्रातील आणि कथेतील त्याने टिपलेल्या वेगळेपणाची झलक दिसते आहे.

टीझरमध्ये आपल्याला आयुष्मान ‘कोई ना कोई चाहिए प्यार करन वाला’ आणि ‘रहने दो छोड़ो भी जाने दो यार’ हे गाणे गाताना दिसतो. तर या दोन्ही गाण्यांमधुन आयुष्मानच्या साध्या आणि अगदी आपल्याशा वाटणाऱ्या अभिनय शैलीला निर्मात्यांनी खुप सुंदरपणे स्पर्श केलेला दिसतो.

येत्या 12 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकर आयुष्मानसोबत दिसणार असुन, भूमी आणि आयुषमान या दोघांचा एकत्र हा तिसरा चित्रपट आहे. या पूर्वी त्या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची खुप पसंती मिळाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teaser of Ayushman Khuran's 'Bala' movie released