संजय दत्तच्या 'बाबा'चे टीझर लॉन्च

'Baba'-Marathi-Movie--Teaser
'Baba'-Marathi-Movie--Teaser

मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये सध्या ‘बाबा’ या संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांची निर्मिती असलेल्या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. या चित्रपटाची सहनिर्मिती संजय एस दत्त प्रॉडक्शन्स यांच्याबरोबर ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’च्या अशोक आणि आरती सुभेदार यांच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. आज या मराठी चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर प्रदर्शित करण्यात आल्यानंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे.

चित्रपटाच्या टीझरवरून या चित्रपटाच्या कथेची कल्पना येते. ही कथा एका वडील व मुलाच्या सुंदर नात्याभोवती फिरते. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात 2 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.

बॉलीवूडमधील आघाडीचा सुपरस्टार संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आहे. निर्माता म्हणून ‘बाबा’हा त्यांचा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाची सह-निर्मिती संजय एस दत्त प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली अशोक आणि आरती सुभेदार यांच्या ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’बरोबर केली आहे. ‘ब्ल्यू मस्टँगने याआधी ‘बकेट लिस्ट’ या माधुरी दीक्षितच्या चित्रपटाची निर्मिती केली होती.

‘बाबा’ या चित्रपटाचे पहिल्या पोस्टरला रसिकांकडून खूप चांगला प्रतिसाद लाभला होता. आता निर्मात्यांनी चित्रपटाचा पहिला टीझर प्रकाशित केला आहे.

‘बाबा’मध्ये ‘तनु वेडस मनू’ आणि ‘हिंदी मिडीयम’ फेम दीपक दोब्रीयाल याची प्रमुख भुमिका आहे. तो या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्यांच्याबरोबर नंदिता पाटकर चित्रपटात दिसणार आहे. त्यांना स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर आणि प्रमुख भूमिकेतील बालकलाकार आर्यन मेंघजी यांची साथ आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आर गुप्ता यांनी केले आहे. त्यांनी झी५ वर प्रदर्शित झालेल्या ‘धागा’ या लघुपटाचे दिग्दर्शन केले होते.

संजय दत्त यांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवरून टीझरबद्दल बोलताना म्हटले आहे की ‘आमची पहिली मराठी चित्रपट निर्मिती ‘बाबा’चा टीझर दाखल करत आहोत’. तर मान्यता दत्त यांनी ‘बाबा’चा टीझर प्रकाशित, निरागसतेची अत्यंत सुंदररीत्या विणलेली कथा’ असे ट्वीट करत म्हटले आहे.

‘बाबा’ चित्रपटाचे दिग्दर्शक राज आर गुप्ता यांनी म्हटले, “माझे असे ठाम मत आहे कि भावनांना भाषा नसते. हा संदेश या चित्रपटातील कलाकारांनी अगदी सुंदररित्या अधोरेखित केला आहे. एक कुटुंब सर्व आव्हानांवर मात करत एकत्र राहण्यासाठी कशी धडपड करत असते, याची ही एक कथा आहे.”

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com