Teaser News: 'काश्मीर फाईल्स' नंतर आता 'The Kerala Story'

रात्रीचे बारा वाजल्यानंतरही मुलगी घरी आली नसेल तर....काश्मीर फाईल्स नंतर आता 'The Kerala Story':
The Kerala Story
The Kerala Story esakal

Bollywood News: बॉलीवूड मनोरंजन विश्वामध्ये सध्या सगळ्यात जास्त चर्चा ही द काश्मीर फाईल्सची आहे. या चित्रपटानं मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांचे लक्ष वेधून (Entertainment News) घेतले आहे. आतापर्यत 120 कोटीहून अधिक व्यवसाय या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर केला आहे. बॉलीवूडमधील कित्येक सेलिब्रेटींनी (Bollywood Movies) काश्मीर फाईल्सचे कौतूक केले आहे. काश्मीर पंडितावर (The kashmir Files) झालेले अत्याचार, त्यांचा संघर्ष यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या चित्रपटानं वेगळ्या प्रकारे वादही तयार केले आहेत. त्यावरुन दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर टीका करण्यात आली आहे. राजस्थानात तर आता हा चित्रपट पाहताना कोणत्याही प्रकारे वाद होऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये म्हणून कोटा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी कलम 144 लागू केले आहे.

यासगळ्या परिस्थितीत आता द केरळ स्टोरी चित्रपटाचा टीझर व्हायरल झाला आहे. त्यालाही नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सोशल मीडियावरील या व्हिडिओला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. निर्माता विपुल अमृतलाल शहा यांनी आपल्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे. यापूर्वी त्यांनी आपल्या ह्युमन नावाच्या सीरिजमध्ये औषध कंपन्या आणि त्यांच्याकडून होणारी फसवणूक यावर भाष्य करण्यात आले होते. प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली शहा आणि प्रीती कुल्हारी यांनी त्या मालिकेत काम केले होते. शहा यांनी त्यांच्या आगामी केरळ स्टोरीचा टीझर व्हायरल केला आहे. त्यात त्यांनी महिलांची तस्करी हा मुद्दा घेतला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या मुद्द्यांवर वेगवेगळ्या माध्यमातून वाचा फोडण्यात आली आहे.

The Kerala Story
Viral Video : माजंरीला पाहण्यासाठी दोन पायांवर उभा राहिला कुत्रा

एक मिनिटं 10 सेकंदाच्या टीझरमध्ये आपल्याला भारतात महिलांच्या तस्करीचा प्रश्न किती गंभीर आहे याविषयी सांगण्यात आले आहे. या विषयावर भारतातील प्रसिद्ध पत्रकारांनी लेखनही केले आहे. त्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, केरळमधून आयएएस आणि जगातील वेगवेगळ्या देशांतील युद्धठिकाणांसाठी महिलांची तस्करी करण्यात येते. स्क्रिनवर एक घडयाळ दाखवण्यात आले आहे. त्यामध्ये बारा वाजल्यानंतर एक प्रश्न नेटकऱ्यांना विचारण्यात येतो. तो म्हणजे तुमची मुलगी रात्रीचे बारा वाजल्यानंतरही घरी येत नसेल तर तुम्हाला काय वाटेल? त्यानंतर टीझरला सुरुवात होते. टीझरमध्ये दाखवण्यात आल्यानुसार आतापर्यत 32 हजार महिलांची तस्करी झाली आहे.

The Kerala Story
Jhund Movie Review: प्रवाहाबाहेरील टीमची व्यवस्थेला 'कीक'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com