Tejashri Pradhan: 'तदैव लग्नम'.. ! तेजश्री प्रधान लवकरच अडकणार लग्नबंधनात?

अभिनेत्री तेजश्री प्रधान लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. हो तुम्ही ऐकताय ते खरं आहे
Tejashri Pradhan, Tejashri Pradhan news, hashtag tadaiva lagnam, subodh bhave, tejashri pradhan wedding
Tejashri Pradhan, Tejashri Pradhan news, hashtag tadaiva lagnam, subodh bhave, tejashri pradhan weddingSAKAL

Tejashree Pradhan News: अभिनेत्री तेजश्री प्रधान लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. हो तुम्ही ऐकताय ते खरं आहे. पण कहानी मे ट्विस्ट असा आहे कि तेजश्री रील नाही तर रियल लाईफमध्ये लग्न करणार आहे.

सध्या अनेक मराठी सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. रावरंभा, बलोच, बटरफ्लाय असे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशातच एक नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अशातच एक नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्याचं नाव 'हॅशटॅग तदेव लग्नम'. सुबोध भावे शुभम फिल्म प्रॉडक्शन निर्मित, आनंद गोखले दिग्दर्शित 'हॅशटॅग तदेव लग्नम' हा कौटुंबिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

(tejashree pradhan and subodh bhave upcoming movie of hashtag tadaiva lagnam movie shooting start soon )

Tejashri Pradhan, Tejashri Pradhan news, hashtag tadaiva lagnam, subodh bhave, tejashri pradhan wedding
Sara Ali Khan: मी मंदिरात जाणारच..! ट्रोल झाल्यानंतर सारा अली खानचं मोठं वक्तव्य

नुकताच या 'हॅशटॅग तदेव लग्नम' चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त सोहळा संपन्न झाला असून या चित्रपटात सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नावावरूनच हा चित्रपट लग्न संस्थेवर भाष्य करणारा दिसतोय.

मात्र या चित्रपटात काय पाहायला मिळणार, हे चित्रपट आल्यावरच कळेल. शेखर मते निर्मित या चित्रपटाची कथा आणि पटकथा आनंद दिलीप गोखले यांचीच आहे.

या चित्रपटासाठी मंदार चोळकर आणि क्षितीज पटवर्धन यांनी गीतलेखन केलं आहे तर पंकज पडघन यांनी संगीत दिलं आहे.

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणतात, '' नुकतीच आम्ही चित्रीकरणाला सुरुवात केली असून सध्या चित्रपटाबद्दलच्या अनेक गोष्टी पडद्याआड आहेत.

लग्नसंस्थेवर आधारित जरी हा चित्रपट असला तरी याची कथा खूप वेगळी आहे. एका परिपक्व नातेसंबंधावर प्रकाशझोत टाकणारी ही कथा आहे. यापूर्वी असा विषय क्वचितच कोणी हाताळला असेल.

Tejashri Pradhan, Tejashri Pradhan news, hashtag tadaiva lagnam, subodh bhave, tejashri pradhan wedding
Asur 2 Review: रहस्यमयी कथानकाला पुराणाची जोड, अर्शद वारसी - अमेय वाघ यांचा असुर २ कसा आहे? वाचा review

याशिवाय दिग्दर्शक आनंद गोखले पुढे म्हणतात, "हा एक कौटुंबिक मनोरंजनात्मक आणि सहकुटुंब बघावा, असा हा सिनेमा असून लवकरच हा चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. यात अनेक नामांकित कलाकार आहेत.''

तर निर्माते शेखर मते म्हणतात, ''हा विषय मला ऐकता क्षणीच भावाला आणि त्वरित या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. प्रेक्षकांना हा विषय निश्चितच आवडेल.'' सिनेमा रिलीज कधी होणार याची तारीख अद्याप निश्चित झाली नसली नुकतंच शूटिंगला सुरुवात झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com