Tejashri Pradhan: आई होऊ न शकणाऱ्या मुलीचं लग्न होईल? तेजश्रीच्या नवीन मालिकेचा प्रोमो पहाच

तेजश्री प्रधानची नवी मालिका प्रेमाची गोष्ट चा पहिला प्रोमो समोर आलाय
tejashri pradhan new serial premachi goshta on star pravah start 4 septemeber 8 pm
tejashri pradhan new serial premachi goshta on star pravah start 4 septemeber 8 pmSAKAL

Tejashri Pradhan New Serial Premachi Goshta News: मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या नव्या मालिकेची सर्वांना उत्सुकता होती. या मालिकेच्या प्रोमोची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज शनिवारी या मालिकेचा प्रोमो आऊट झालाय.

तेजश्री प्रधानच्या नवीन मालिकेचं नाव आहे प्रेमाची गोष्ट. या नवीन मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या प्रोमोवर प्रेक्षकांनी पसंती दिलीय

tejashri pradhan new serial premachi goshta on star pravah start 4 septemeber 8 pm
Rocky aur Rani Ki Prem Kahani: सिनेमात शबाना आझमींसोबत लिपलॉक सीन, धर्मेंद्र म्हणतात, या वयात..

प्रेमाची गोष्ट मालिकेच्या प्रोमोत काय?

प्रेमाची गोष्ट मालिकेचा पहिला प्रोमो भेटीला आलंय. या प्रोमोत तेजश्री एका मध्यमवर्गीय कुटूंबातली मुलगी दिसतेय. तिची आई तिला लग्नासाठी स्थळं शोधत असते. पण तेजश्री आईला म्हणते, मुल जन्माला घालु न शकणारी मुलगी बायको म्हणुन चालेल का?

पुढे दुसऱ्या घरात एक कोळी कुटूंब दिसतं. याच कुटूंबातला एक मुलगा (राज हंचनाले) ऑफीसला जाण्याच्या तयारीत असतो. त्याची आई त्याला लग्नासाठी मुलींचे फोटो दाखवते. ही मुलगी सईची आई होऊ शकेल का? असं तो आईला विचारतो.

पुढे एक लहान मुलगी धावत येते. तेजश्री तिच्यासोबत खेळताना दिसते. ही मुलगी राजची असते. अशाप्रकारे या मालिकेचा प्रोमो भेटीला येतोय.

प्रेमाची गोष्ट या हिंदी मालिकेचा रिमेक

प्रेमाची गोष्ट ही मालिका ये हे मोहब्बते या हिंदी मालिकेचा रिमेक आहे. ये हे मोहब्बते मालिकेत करण पटेल, दिव्यांका त्रिपाठी प्रमुख भुमिकेत होते. प्रेमाची गोष्ट या मालिकेत तेजश्री प्रधान, राज हंचनाले प्रमुख भुमिकेत आहेत. याशिवाय शुभांगी गोखले, संजीवनी जाधव सुद्धा प्रमुख भुमिकेत आहेत.

tejashri pradhan new serial premachi goshta on star pravah start 4 septemeber 8 pm
Hemant Dhome: पाटलीणबाई, प्रिमियर शो ला तुझ्या सोबत आलो अन्.. बायकोचा सिनेमा पाहून हेमंत ढोमेची लय भारी पोस्ट

तेजश्री प्रधानने व्यक्त केल्या भावना

या नव्या पात्राविषयी सांगताना तेजश्री म्हणाली, ‘मी ठरवून एक प्रोजेक्ट संपल्यानंतर काही काळ दिसणं टाळते. देवकृपेने प्रेक्षक माझ्या नव्या प्रोजेक्टची आतुरतेने वाट पहात असतात. जसं घरातली एखादी व्यक्ती कामानिमित्ताने बाहेर गेली की घरातले तिच्या वाटेकडे डोळे लावून बसेलेले असतात. अगदी तसाच अनुभव एक कलाकार म्हणून मीही घेतलाय. गेले कित्येक दिवस पुन्हा कधी भेटीला येणार याविषयी विचारणा होत होती.

१२ वर्षांपुर्वी केलेलं स्टार प्रवाहवर काम

तेजश्री प्रधान पुढे सांगते, "स्टार प्रवाहवर लवकरच एका नव्या मालिकेतून मी भेटीला येणार आहे हे सांगताना अतिशय आनंद होतोय. मला सकारात्मक भूमिका साकारायला आवडतं. माझी नवी भूमिका देखिल सकारात्मकच असेल. टेलिव्हिजन हे माझं आवडतं माध्यम आहे. खरतर कोरोना नंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत."

"सोशल मीडियाचं महत्त्वही दिवसेंदिवस वाढत आहे. मी या सर्वच गोष्टी पुन्हा एकदा नव्याने अनुभवतेय. प्रामाणिकपणे काम करण्याचा नेहमीच प्रयत्न करत आले आहे आणि यापुढे देखिल करत राहिन. प्रेक्षकांचं प्रेम असंच मिळत राहो हीच अपेक्षा. जवळपास १२ वर्षांपूर्वी मी स्टार प्रवाहची तुझं नि माझं घर श्रीमंताचं ही मालिका केली होती. काही दिवसांपूर्वी फुलाला सुगंध मातीचा मालिकेतही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. नव्या मालिकेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीसोबत पुन्हा एकदा जोडली जातेय याचा आनंद आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com