
ही अभिनेत्री होणार आमदार, देवमाणूस मालिकेत नवी एन्ट्री..
झी मराठी (zee marathi) वरील देवमाणूस (Devmanus)या मालिकेने पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. या पर्वाला देखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. ही मालिका इन्स्पेक्टर मार्तंड जामकर यांच्या एंट्री नंतर अतिशय रंजक वळणावर आली आहे. देवमाणूस या मालिकेत क्षणाक्षणाला प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का मिळतो. अशातच मालिकेत आमदार देवयानी गायकवाड या पात्राची एन्ट्री होणार आहे.
हेही वाचा: Bookmyshow: 'बुक माय शो'ला मनसे देणार दणका.. अमेय खोपकरांच्या अल्टिमेटम
हि भूमिका अभिनेत्री तेजस्विनी लोणारी (tejaswini lonari) साकारते आहे.हा चेहरा तास परिचयाचा आहे. याआधीही तेजस्विनीने मालिका आणि चित्रपटातून काम केल आहे.सध्या मालिकेतआमदारबाई सोबत डील करण्यासाठी अजित आणि डिम्पल जातात पण तिचा रुबाब आणि वागणं पाहून दोघेही धास्तावतात. आमदार बाई हि खूप डेंजर आहे असं डिम्पल अजितला सांगते.
आपल्या नवीन भूमिकेबद्दल बोलताना तेजस्विनी म्हणाली, "देवमाणूस मध्ये मी आमदार देवयानी गायकवाड हि भूमिका निभावतेय. देवयानी हे एक अतिशय स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आहे आणि ती तिचं काम करत असताना तिच्या वाकड्यात जर कोणी शिरलं तर ती त्या व्यक्तीला सोडत नाही हे ती वारंवार दाखवून देते. त्यामुळे गावात तिचा दबदबा आहे. राणी पद्मिनी या मालिकेनंतर मी अनेक चित्रपट केले आणि चित्रपटांमध्ये काम करण्याचा अनुभव खूपच वेगळा होता. त्यानंतर देवमाणूस हि माझी पहिलीच मराठी मालिका आहे."
Web Title: Tejaswini Lonari Comeback With Devmanus Serial On Zee Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..