
रानबाजार:'30 सेकंदाचा 'तो' किसिंग सीन दिला कारण...';तेजस्विनीचा मोठा खुलासा
अभिजित पानसे दिग्दर्शित 'रानबाजार'(Ranbazar) ही वेबसिरीज लवकरच आपल्या भेटीला येत आहे. या वेबसिरीजचा टिझर रिलीज झाला अन् त्याबरोबर चर्चेत आली ती त्यात बोल्ड अंदाजात दिसलेली तेजस्विनी पंडित(Tejaswini Pandit). या वेबसिरीजमध्ये अभिनय करतानाचा अनुभव याविषयी सकाळ पॉडकास्टच्या माध्यमातून तेजस्विनीनं दिलखुलास संवाद साधला आहे. तेजस्विनीनं थेट ३० सेकंदाच्या मोठ्या कालावधीच्या किसिंग सीनविषयी खुलासा केला आहे. नेमकं काय म्हणालीय तेजस्विनी हे ऐकण्यासाठी बातमीत खाली पॉडकास्ट मुलाखतीची लिकं दिलेली आहे. ती नक्की ऐका.
तेजस्विनी पंडितनं तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत खूप विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. तिनं साकारलेल्या 'सिंधुताई सपकाळ' भूमिकेनं तर तिच्या नावावर अनेक पुरस्कारांची नोंद केली. पण गेल्या काही वर्षात अनुभवागणिक सिनेमांची निवड करताना तेजस्विनी बदलताना दिसली. 'समांतर' या वेबसिरीजमध्येही स्वप्निल जोशी सोबत तिचा किसिंग सीन आहे पण रानबाजार मधील ३० सेकंदाचा कालावधी हा किसिंग सीनसाठी खूप मोठा आहे असं म्हणत अनेकांच्या भूवया तो सीन पाहताना उंचावल्या होत्या. आता तेजस्विनीनं ते बोल्ड सीन,आणि किसिंग सीन तिनं का केले आणि ते नेमके कसे शूट झाले, यामधलं गिमिक या मुलाखतीतून सांगितलं आहे. यासाठी तेजस्विनीच्या पॉडकास्ट मुलाखतीची लिंक या बातमीत जोडली आहे. तेव्हा तिची मुलाखत नक्की ऐका.
हेही वाचा: '3 तास विमानात अडकून पडलो,मदतही मागितली पण..' एअरलाइनवर दिया मिर्झाचा आरोप
तेजस्विनीनं या पॉडकास्ट मुलाखतीत थेट प्रेक्षकांनाच काही प्रश्न विचारले आहेत. हॉट,बोल्ड पाहिल्यावर नावं ठेवणारे प्रेक्षक वेब सिरीज राजकारणावर आहे कळल्यावर नाराज का झाले? हा थेट प्रश्न लोकांना विचारत तिनंवेब सिरीज विषयी देखील अनेक खुलासे केले आहेत. सिरीज शूट करताना राजकारणाची काळी बाजू समजली तेव्हा शॉक झालेली तेजस्विनी काय म्हणाली Politics विषयी जाणून घ्यायचं असेल तर तिची पॉडकास्ट मुलाखत नक्की ऐका,वर बातमीत तिची लिंक जोडलेली आहे.
Web Title: Tejaswini Pandit Exclusive Podcast Interview
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..