
Tejaswini Pandit: अमृता खानविलकरसाठीच तेजस्विनी पंडीत बनली निर्माती?; अभिनेत्रीच्या खुलास्यानं सगळेच हैराण
Tejaswini Pandit: तेजस्विनी पंडीत आता केवळं अभिनेत्री म्हणून नाही तर निर्माती म्हणूनही आपल्या समोर आली आहे. 'पॉंडिचेरी','चंद्रमुखी','अथांग' आणि आता 'बांबू' अशा वेगवेगळ्या धाटणीच्या सिनेमांची निर्मिती तेजस्विनी पंडीतनं केली आहे. यातील 'पॉंडिचेरी' आणि 'चंद्रमुखी' या पहिल्या दोन सिनेमांत अमृता खानविलकर लीड भूमिका साकारताना दिसली होती.
यातील चंद्रमुखीनं नुसतीच चांगली कमाई केली नाही तर जगभरातील अनेकांना आपल्या गाण्याचं वेडही लावलं. आता इथपर्यंत सगळं ठीक आहे पण यानंतर चर्चा सुरु झाली ती या सिनेमाची निर्मिती करणाऱ्या तेजस्विनीनं सिनेमात अभिनेत्री म्हणून अमृतालाच का घेतलं? आणि ते ही बॅक टू बॅक दोन्ही सिनेमांत अमृताच. आता यामागचं कारण सांगत तेजस्विनीनं 'पटलं तर घ्या' या प्लॅनेट मराठी वरील कार्यक्रमात याविषयी मोठा खुलासा केला आहे.(Tejaswini Pandit on amruta khanvilkar her producer journey)
'पटलं तर घ्या' हा सेलिब्रिटी चॅट शो नुकताच प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुर झाला आहे. या शो च्या पहिल्या भागात आपण ८ एपिसोड विनामूल्य पाहू शकणार आहोत. पहिल्या भागात तेजस्विनी पंडीत आणि अभिजित पानसे ही जोडी आली होती. कार्यक्रमाची होस्ट जयंती वाघधरेनं काही थेट सवाल यात सेलिब्रिटींना केले,ज्याच्या उत्तरांची आता चर्चा रंगू लागली आहे.
हेही वाचा: ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

तेजस्विनीला याच कार्यक्रमात प्रश्न विचारला गेला की,''पॉंडिचेरी' आणि 'चंद्रमुखी' या दोन्ही सिनेमांची निर्मिती तू फक्त आणि फक्त अमृता खानविलकरसाठीच केली होतीस अशी चर्चा रंगली होती..याविषयी काय सांगशील..'',तेव्हा तेजस्विनीनं जोरदार हसत सुरुवातीला तर असं मुळीच नव्हतं या अॅटिट्युडमध्ये लूक दिला.
आणि विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणाली, ''मी अक्षय बर्दापूरकर यांच्या खातर या सिनेमांची निर्मिती केली होती..'',अमृतासाठी नाही हे तिथेच स्पष्ट झालं. पण पुढे तेजस्विनी म्हणाली,''आता हे मला माहित नाही की अक्षय बर्दापूरकर यांनी कोणाच्या प्रेमाखातर त्या चित्रपटांची निर्मिती केली'' असं तेजस्विनी बोलल्यानंतर कोड्यातलं जोरदार हसू मात्र सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसलं. आता तेजस्विनीनं हे स्पष्ट करुन अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला फुलस्टॉप दिला आहे.
'पटलं तर घ्या' हा सेलिब्रिटी चॅट शो प्लॅनेट मराठीवर पाहण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले गेलेले नाही.