Gadar 2 First Look: ढाई किलो का हाथ येतोय.. गदर 2 मध्ये सनी देओलचा दमदार अंदाज, या दिवशी होणार रिलीज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gadar 2, gadar 2 first look, sunny deol, amisha patel

Gadar 2 First Look: ढाई किलो का हाथ येतोय.. गदर 2 मध्ये सनी देओलचा दमदार अंदाज, या दिवशी होणार रिलीज

Gadar 2 First Look : सध्या गदर 2 ची चर्चा सुरु आहे. या सिनेमाच्या दुसऱ्या भागाचं म्हणजेच गदर २ चं पोस्टर रिलीज झालंय. सनी देओलचा दमदार अंदाज पोस्टर मध्ये पाहायला मिळतोय. दुसऱ्या भागामध्ये देखील हेच सेलिब्रेटी काम करणार आहेत. 2001 मध्ये गदर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. वीस वर्षानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे.

(gadar 2 first look poster out sunny deol and ameesha patels film release on this date )

हेही वाचा: Gadar 2: तारा सिंग पुन्हा जाणार पाकिस्तानात पण या वेळी सकिनासाठी नाही तर...

'गदर 2' च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे मात्र त्याची अंतिम तारीख अद्याप समोर आलेली नव्हती. 'गदर' हा याच नावाच्या 2001 मध्ये आलेल्या चित्रपटाचा सिक्वेल आहे. अखेर या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. गदर २ सिनेमा ११ ऑगस्ट २०२३ ला सिनेमा भारतभरात रिलीज होणार आहे.

'हिंदुस्तान जिंदाबाद है.. जिंदाबाद था और जिंदाबाद रहेगा' अशा शब्दात सनी देओलने गदर २ ची पोस्ट शेयर केली आहे. या वर्षी स्वतंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर गदर २ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोन दशकानंतर येणाऱ्या या सिक्वेलची तमाम प्रेक्षकांना आतुरता आहे. काही दिवसांपूर्वी गदर २ बद्दल मात्र वेगळाच वाद निर्माण झालेला.

गदर २ चे चित्रिकरण सुरु असताना ज्या लोकेशनवर या चित्रपटाचे शुटींग सुरु होते त्या जागा मालकानं निर्मात्यांना नोटीस पाठवल्याचे कळते आहे. त्यानं त्या जागेचे भाडे आपल्याला अद्याप मिळालं नसल्याचे सांगितलं आहे. त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 56 लाखांचे भाडे बाकी होते. ते जोपर्यत येणार नाही तोपर्यत आपण शुटींगसाठी परवानगी देणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. पालमपूर मध्ये हि घटना घडली होती.

हेही वाचा: Pooja Sawant Birthday: 'ए कलरफुल' जिच्यावर तरुणाई फिदा अशी सावंतांची पुजा

2023 च्या बहुचर्चित सिनेमांच्या यादीत गदर २ चा सुद्धा समावेशआहे. आज प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर 'गदर 2' पोस्टर आऊट झालंय. यात सनी पाजीचा दमदार लूक दिसतोय. सनी देओलला तारा सिंगच्या अवतारात पाहून त्याचे फॅन्स आनंदाने वेडे झाले आहेत. अल्पावधीतच या पोस्टरवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झालाय. त्यामुळे आता ११ ऑगस्ट २०२३ ला गदर २ काय धुराळा करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे