तेलुगू अभिनेता अमित पुरोहित यांचे निधन

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 जुलै 2019

- टॉलीवूड अभिनेते अमित पुरोहित यांचे निधन

बिना : प्रसिद्ध टॉलीवूड अभिनेते अमित पुरोहित यांचे निधन झाले. अमित पुरोहित यांचा मृत्यू कशामुळे झाला याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही. मात्र, हृदयविकाराचा तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या निधनाची माहिती तेलुगू चित्रपटातील अभिनेते सुधीर बाबू यांनी ट्विटवरून दिली.

अमित पुरोहित यांनी आत्तापर्यंत अनेक तेलुगू चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या. 'संमोहन' चित्रपटातील त्यांची भूमिका अत्यंत गाजली होती. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर टॉलीवूडमध्ये शोक व्यक्त केला जातो. अमित पुरोहित यांचे पार्थिव मध्य प्रदेशातील बिना येथे आज (गुरुवार) आणण्यात आले. त्यानंतर झांसी गेट मुक्ती धाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबत सुधीर बाबू यांनी सांगितले, की अमित पुरोहित यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अत्यंत दु:ख झाले. त्यांनी 'संमोहन'मध्ये भूमिका बजावली होती. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू होता. आम्ही एक चांगला अभिनेता गमावला आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, हीच परमेश्वराकडे प्रार्थना.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Telugu actor Amit Purohit passes away