तेलुगू अभिनेता TNR यांचे कोविडनं निधन

TNR हे त्यांच्या फ्रँकली स्पिकिंग चॅनलवर प्रसिध्द अशा सेलिब्रेटींची मुलाखत घेत असतं.
TNR actor
TNR actor Team esakal

मुंबई - कोरोनामुळे निधन होणा-या सेलिब्रेटींची संख्या आता वाढत चालली आहे. त्यामुळे केवळ बॉलीवूडच नाही तर जगभरातील वेगवेगळया सिनेमासृष्टीमध्ये कोरोनाचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा परिणामही जाणवू लागला आहे. एक प्रख्यात पत्रकार, युट्युबर आणि अभिनेता म्हणूनही टीनआर (TNR) सर्वपरिचित होते. त्यांच्या निधनानं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. हैद्रराबाद मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

प्रख्यात युट्युबर अँकर, पत्रकार आणि अभिनेता थुम्मुला नरसिम्हा रेड्डी (TNR) यांचे सोमवारी कोविडच्या कारणानं निधन झाले आहे. TNR हे लोकप्रिय होते. त्यांनी हैद्राबादमधील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांना उपचारासाठी त्याठिकाणी दाखल करण्यात आले होते. ज्यावेळी त्यांना कोरोना झाल्याचे कळले तेव्हा ते घरीच क्वॉरनटाईन होते. ऑक्सिजनचा अडथळा तेव्हा जाणवू लागला त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते.

TNR actor
राधेमधलं तिसरं गाणं व्हायरलं, 'झुम-झुम' ला लाखो व्ह्युज
TNR actor
केदार शिंदे पुन्हा चढला बोहल्यावर; पाहा लग्नसोहळ्याचे फोटो

TNR हे त्यांच्या फ्रँकली स्पिकिंग चॅनलवर प्रसिध्द अशा सेलिब्रेटींची मुलाखत घेत असतं. त्यामुळे ते प्रचंड लोकप्रिय झाले होते. त्यांनी चरित्र अभिनेता म्हणूनही काही चित्रपटांमध्ये भूमिका केली होती. बोनी, नेने राजु नेने मंत्री, जॉर्ज रेड्डी यासारख्या चित्रपटांमध्ये ते चमकले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com