esakal | राधेमधलं तिसरं गाणं झालं व्हायरलं, 'झुम-झुम' ला लाखो व्ह्युज
sakal

बोलून बातमी शोधा

Salman khan

राधेमधलं तिसरं गाणं व्हायरलं, 'झुम-झुम' ला लाखो व्ह्युज

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडच्या भाईजानच्या नवीन चित्रपटाची त्याच्या चाहत्यांना मोठी उत्सुकता असते. ईदच्या दिवशी त्याचा बहुचर्चित राधे - युवर मोस्ट वाँटेड भाई हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमाननं त्याचं जोरदारपणे प्रमोशन सुरु केले आहे. त्याच्या या नव्या चित्रपटाच्या ट्रेलरला, त्यातील गाण्याला प्रेक्षकांनी पसंत केले आहे. त्याला लाखोंच्या संख्येनं हिट्स मिळाले आहे. आता या चित्रपटातील झुम झुम नावाचे गाणे प्रदर्शित झाले आहे. अल्पावधीतच त्यालाही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे.

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या काळात लोकांच्या मदतीसाठी बॉलीवूडचे सेलिब्रेटीही सरसावले आहेत. त्यात सलमानचे ही नाव घ्यावे लागेल. त्यांनी अनेक ठिकाणी ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याशिवाय बॉलीवूडमधील हजारो कर्मचा-यांच्या खात्यात एक ठराविक रक्कम जमा करण्याचा निर्धारही त्यानं व्यक्त केला आहे. त्यामुळे त्याला अनेकांनी धन्यवाद दिले आहे.

राधे चित्रपटाच्या प्रदर्शनाला तीन दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जोरदार तयारी केली आहे. या चित्रपटात सलमान खानसह दिशा पटानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यातील झुम झुम नावाचे एक गाणे प्रदर्शित झाले आहे. यापूर्वी राधे टायटल साँग, सिटी मार नावाचे गाणेही प्रदर्शित झाले होते. त्यालाही तरुणाईचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता. गाण्यांना मिळालेला प्रतिसाद पाहता चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

हेही वाचा: अजुनही यौवनात मी! ७० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींचा 'व्हेकेशन मोड ऑन'

हेही वाचा: केदार शिंदे पुन्हा चढला बोहल्यावर; पाहा लग्नसोहळ्याचे फोटो

झुम झुम हे एक रोमँटिक गाणे आहे. त्यात अनेक अॅक्शन स्टंटही आहेत. त्यात सलमान आणि दिशाची एक वेगळी केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. साजिद - वाजिद यांनी या गाण्याचे कंपोझिशन केले आहे. तर गीतलेखन कुणाल वर्मा यांचे आहे. ऐश किंग आणि इलुलिया वंतुर यांच्या आवाजातील ही गाणें सध्या ट्रेडिंग आहे. सलमानचा हा नवा चित्रपट १३ मे ला प्रदर्शित होणार आहे.