Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलिनला दिलासा; 200 कोटींच्या प्रकरणात जामीन मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jacqueline Fernandez

Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलिनला दिलासा; 200 कोटींच्या प्रकरणात जामीन मंजूर

Jacqueline Fernandez News : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात पतियाळा हाऊस कोर्टाने दिलासा देत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जॅकलीनविरुद्ध आरोपपत्र सादर केल्यानंतर तिला आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.

‘सुकेश चंद्रशेखरने खंडणीसह गुन्हेगारी कृत्यांमधून जॅकलीन फर्नांडिसला ५.७१ कोटींच्या विविध भेटवस्तू दिल्या होत्या. चंद्रशेखर बराच काळ तिचा साथीदार होता. सुकेशने सहआरोपी पिंकीच्या माध्यमातून जॅकलीनला या भेटवस्तू दिल्या होत्या’ असे ईडीने एका निवेदनात म्हटले होते. चंद्रशेखरने फर्नांडिसला भेटवस्तू देण्यासाठी बेकायदेशीर पैशांचा वापर केला, असा आरोपही ईडीने केला आहे.

हेही वाचा: Navratri 2022 निमित्त मुख्यमंत्र्यांकडून महिलांसाठी महत्वाची घोषणा

‘सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) हा गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून दिल्ली पोलिसांद्वारा अटक होईपर्यंत जॅकलीन फर्नांडिसशी नियमित संपर्कात होता’ असे एजन्सीने तपासात आढळल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी ईडीने आतापर्यंत चंद्रशेखर, पत्नी लीना मारिया पॉल आणि पिंकी इराणी यांच्यासह आठ जणांना अटक केली आहे. दिल्ली न्यायालयात दोन आरोपपत्रेही दाखल केली आहेत.