बाळासाहेब ठाकरेंचा झंझावात पुन्हा येतोय..!

वृत्तसंस्था
बुधवार, 26 डिसेंबर 2018

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साकारली आहे. चित्रपटाचे पोस्टर आधीच प्रसिद्ध झाले असून सोशल मीडियात नवाजच्या लूकची जोरदार चर्चा आहे. 

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर येऊ घातलेला बहुचर्चित 'ठाकरे' चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील काही दृश्य व संवादांवर आक्षेप घेतला आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असतानाच सेन्सॉरने आक्षेप नोंदवल्याने पेच निर्माण झाला आहे. 

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साकारली आहे. चित्रपटाचे पोस्टर आधीच प्रसिद्ध झाले असून सोशल मीडियात नवाजच्या लूकची जोरदार चर्चा आहे. 

'ठाकरे'च्या लॉन्चला उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, खा. संजय राऊत उपस्थित होते. तर बाळासाहेबांच्या भूमिकेतील नवाजुद्दीन सिद्दीकी, अमृता राव तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. हा चित्रपट मराठी व हिंदी भाषेत प्रदर्शित होणार असून त्याचा सिक्वलचाही विचार सुरू असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. 

चित्रपटाची निर्मिती ही खाय संजय राऊत यांनी केली असून चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत पानसे यांनी केले आहे. 

नवाजने बाळासाहेबांची व्यक्तिरेखा नेमकी कशी साकारली आहे, याबद्दल तमाम सिनेप्रेमींना उत्सुकता आहे. चित्रपट 23 जानेवारी 2019 रोजी प्रदर्शित होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thackeray Trailer Release