Thane Crime Branch Team
Thane Crime Branch Teamesakal

अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत मोठी वाढ; पोलीस पोहचलं कळंबोलीतल्या घरी

Summary

शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणं अभिनेत्री केतकी चितळेला चांगलंच महागात पडलंय.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणं अभिनेत्री केतकी चितळेला (Ketki Chitale) चांगलंच महागात पडलंय. केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय. ठाणे पोलिसांनी केतकी चितळेला अटक केली असून केतकीची कळवा पोलिस ठाण्यात चौकशी सुरुय. ठाणे गुन्हे शाखा युनिट 1 कडून केतकी चितळेची चौकशी सुरुय. कळंबोली पोलिसांकडून (Kalamboli Police) ठाणे पोलिसांनी केतकी चितळेचा ताबा घेतलाय.

आज ठाणे पोलीस (Thane Police) केतकी चितळे हिला घेऊन तिच्या कळंबोली इथल्या घरी पोहचलं आहे. केतकीच्या घरातून लॅपटॉप आणि इतर कागदपत्र घेण्यासाठी पोलीस तिच्या घरी दाखल झालं आहेत. लॅपटॉपमध्ये आणखी काही आक्षेपार्ह माहिती मिळतेय का याची तपासणी पोलीस करत आहेत. त्यानंतर तीला पुन्हा ठाणे पोलीस स्टेशनला (Thane Police Station) आणलं जाईल. केतकीला अटक करताना पोलिसांनी आधीच तिचा मोबाईलही जप्त केला होता.

Thane Crime Branch Team
मुस्लिम पक्ष न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार; काय म्हणाले ओवैसी?

दरम्यान, केतकी चितळेविरोधात 15 ठिकाणी गुन्हा दाखल झालाय. उस्मानाबाद, पारनेरनंतर आज नवी मुंबईतही केतकीविरोधात गुन्हा दाखल झालाय. शरद पवार यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट केल्यानं केतकीविरोधात गुन्हे दाखल होत आहेत. राज्यातील गोरेगाव, पवई, भोईवाडा, कळवा, नेरूळ, पुणे, पिंपरी चिंचवड देहूरोड, नाशिक, धुळे, अकोला, अमरावती, जळगाव, सातारा, उस्मानाबाद, पारनेर पोलीस ठाण्यात केतकी चितळे विरोधात एफआयआर नोंदवले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com