
Thank God Movie: कोर्ट म्हणाले, एवढा महत्वाचा विषय आहे का तो? पुढे बघु!
Thank God Movie: प्रदर्शनापूर्वी बॉलीवूडचे चित्रपट कोर्ट कचेऱ्यांमध्ये सापडणे हे आता नवीन राहिले नाही. हल्ली दर आठवडी एखादा चित्रपट कोर्टाच्या वादात अडकत असल्याचे दिसून आले आहे. सध्या बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचा थँक गॉड नावाचा चित्रपटावरुन वेगळ्याच वादाला सुरुवात झाली आहे. तो वाद कोर्टात गेला आहे. त्यावर आता मेकर्सला कोर्टानं दिलासा दिला आहे. अजयचा हा चित्रपट 25 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असून कायदेशीर बाबींमध्ये हा चित्रपट सापडल्यानं त्याच्या प्रदर्शनावरुन वाद पेटला होता.
सर्वोच्च न्यायालयानं आता निर्मात्यांना मोठा दिलासा देत उच्च न्यायालयानं या चित्रपटावर तातडीनं निर्णय घेण्याच्या याचिकेवर सुनावणी केली आहे. कोर्टानं ती याचिका फेटाळून लावत आपल्याला एवढ्य़ा तातडीनं या चित्रपटावर सुनावणी घेणं हे महत्वाचे वाटत नसून पुढे बघुया असे म्हटले आहे. याप्रकरणावर कोर्टानं आता 9 नोव्हेंबरची तारीख दिली आहे.
काही दिवसांपूर्वी थँक गॉड या चित्रपटाचा ट्रेलर व्हायरल झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते. त्यावरुन श्री चित्रगुप्त वेलफेयर ट्रस्टच्या वतीनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यात थँग गॉडचा ट्रेलर हा सोशल मीडियावरुन डिलीट करण्याची मागणी त्या याचिकेत केली गेली. उच्च न्यायालयानं हे प्रकरण सर्वोच्च कोर्टाकडे सोपवले होते. त्यावर कोर्टानं सध्याच्या घडीला हा विषय एवढा महत्वाचा नसून पुढे बघुया असे म्हटले होते.
थँक गॉड प्रदर्शित करण्यावर देखील आक्षेप या याचिकेत करण्यात आला होता. लाईव्ह लॉ या संकेतस्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, अधिवक्ता लोकेश कुमार चौधरी यांच्यावतीनं मेकर्सच्या विरुद्ध याचिका दाखल करण्यात आली होती. त्यात असे म्हटले होते की, मेकर्सनं भगवान चित्रगुप्त यांच्या चरित्राचे हनन करण्यात आले आहे. त्यांचे चित्रण आक्षेपार्ह पद्धतीनं केले गेल्यानं लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश यु यु ललित, न्यायमुर्ती बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठानं तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला.