Kangana Ranaut on Pathaan: देशाने फक्त खान आणि मुस्लिम अभिनेत्रींवर प्रेम केले.. कंगना पुन्हा बरळली

पठाण चं यश मात्र कंगनाला तितकं पचनी पडलं नाहीये.
Kangana Ranaut, pathaan, shah rukh khan
Kangana Ranaut, pathaan, shah rukh khan SAKAL

Kangana Ranaut on Pathaan: कंगना रणौत आणि वाद हे समीकरण आता जगजाहीर आहे. शाहरुख चा 'पठाण' जसा रिलीज झालाय तसं कंगना तिच्या विविध वक्तव्यामुळे चर्चेत आहे. शाहरुखच्या पठाणला देशभरातून प्रेक्षकांचं तुफान प्रेम मिळत आहे. पण पठाण चं यश मात्र कंगनाला तितकं पचनी पडलं नाहीये. कंगनाने पुन्हा एकदा एक वक्तव्य सोशल मीडियावर केलंय. यामुळे कंगनाने नवीन वाद ओढवून घेतलाय.

Kangana Ranaut, pathaan, shah rukh khan
Pathaan Movie: शाहरुखचा जलवा.. पहिल्याच दिवशी पठाण ने कमावले १०० कोटी

एका फॅनने सोशल मीडियावर पठाणचं स्क्रीनिंग सुरु असताना थियेटर मध्ये किती जल्लोष आहे असा व्हिडिओ शेयर केलाय. या व्हिडिओला रिट्विट करत कंगना म्हणाली,"खूप चांगलं विश्लेषण केलंय... या देशाने फक्त आणि फक्त सर्व खानांवर प्रेम केले आहे आणि काही वेळा फक्त आणि फक्त खानांवरच प्रेम केले आहे... याशिवाय मुस्लिम अभिनेत्रींवर लोकांनी वेड्यासारखं प्रेम केलंय, त्यामुळे भारतावर द्वेष आणि फॅसिझमचा आरोप करणे अत्यंत अयोग्य आहे... जगात संपूर्ण भारतासारखा देश नाही.." असं खोचक वक्तव्य कंगनाने केलंय.

कंगनाने असं बोलून नवीन वाद ओढवून घेतलाय. नेटकऱ्यांनी कंगनाची चांगलीच शाळा घेतलीये. "तुला दुसरं काही काम नाही, इथे तू दिवसभर बकवास बोलतोस", "तुला फक्त द्वेष पसरवता येतो", "देशभक्तीला कोणत्याही धर्म, जात, वंश, पंथ, रंगाची पर्वा नसते", "या देशात जया, रेखा, माधुरी दीक्षित, मनीषा कोयराला, जुही चावला अशा अभिनेत्रींवर सुद्धा प्रेम केलंय" अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी कंगनाला चांगलंच झापलं आहे.

कंगनाने याआधी सुद्धा अशाच पद्धतीचं ट्विट केलंय, 'माझं मत आहे की भारतीय मुस्लिम हे देशभक्त आणि अफगाण पठाणांपेक्षा खूप वेगळे आहेत...तात्पर्य असं की, भारत कधीच अफगाणिस्तान होणार नाही, अफगाणिस्तानमध्ये काय चालले आहे ते आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. त्याभागातली परिस्थिती ही नरकाच्या पलीकडे आहे. कथेचा विचार केला तर चित्रपटाचं नावं 'पठाण' योग्य नाव आहे. तो भारतीय पठाण आहे.'

अशाप्रकारे पठाण रिलीज झाल्यानंतर कंगना सोशल मीडियावर विविध वक्तव्य करून चर्चेत आहे. कंगनाच्या आगामी इमर्जंसी सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालंय. कंगना या सिनेमात भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. २० ऑक्टोबर २०२३ ला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com