
Pathaan Movie: शाहरुखचा जलवा.. पहिल्याच दिवशी पठाण ने कमावले १०० कोटी
Pathaan 100 cr Entry: शाहरुख खानचा पठाण काल २५ जानेवारीला संपूर्ण जगभरात रिलीज झाला. पहिल्याच दिवशी पठाण ने सगळ्यांचे रेकॉर्ड मोडीत काढले. पठाण ने जगभरातुन १०० कोटींची कमाई केली आहे. जगभरातुन पठाण ला तुफान प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पठाण पहिल्याच दिवशी १०० कोटी क्लब मध्ये दाखल झालाय. शाहरुख ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर आला आणि त्याने रेकॉर्ड केला.
( shah rukh khan pathaan movie enter in 100 crore club break record of bahubali 2 )
पठाणने ऍडव्हान्स बुकिंग मध्येच KFG २ चा रेकॉर्ड मोडीत काढला होता. आणि आता पहिला दिवस संपल्यावर पठाण ने बाहुबली २ ला सुद्धा धोबीपछाड केलं. त्यामुळे पठाण पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा भारतातला पहिला सिनेमा ठरला आहे. शाहरुख खान आणि त्याच्या फॅन्सचा जलवा बॉक्स ऑफिस वर गाजतोय.
पठाण निमित्ताने शाहरुख खानने 4 वर्षांनंतर पुनरागमन केलं. अॅक्शन-थ्रिलर 'पठाण' अखेर काल २५ जानेवारीला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. बॉलिवूडच्या बादशहाला पाठिंबा देण्यासाठी त्याचे फॅन्स मोठ्या संख्येने थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. 'पठाण'ने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये ज्याप्रकारे रेकॉर्ड केले आहेत, त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ओपनिंग देणार असा सर्वांना अंदाज होताच. पठाण आता १०० कोटी क्लबमध्ये दाखल झाल्याने तो अंदाज खराही ठरला
पठाण सिनेमात शाहरुख खान हा एक RAW एजन्ट दाखवला आहे. यानिमित्ताने यशराज फिल्मस त्यांचं स्वतःच स्पाय युनिव्हर्स तयार करत आहे. हृतिक रोशनचे वॉर आणि सलमान खानचा टायगर हे सुद्धा एकाच स्पाय युनिव्हर्सचे भाग आहेत. पठाण सिनेमात टायगर च्या भूमिकेतून सलमान खान शाहरुख खानला मिशन मध्ये मदत करतो असं दाखवलं आहे. त्यामुळे सलमान खानच्या आगामी टायगर ३ सिनेमात शाहरुख , हृतिक एकत्र येण्याची शक्यता आहे.