'The Diary of West Bengal' चा ममता दीदींनी घेतला धसका? दिग्दर्शकाविरोधात तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The Diary of West Bengal

'The Diary of West Bengal' चा ममता दीदींनी घेतला धसका? दिग्दर्शकाविरोधात तक्रार

The Diary of West Bengal Movie Sanoj Mishra Director : दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्या द केरळ स्टोरीनं साऱ्या देशात वेगळ्या प्रकारचे वातावरण तयार केले आहे. यासगळ्यात अनेक राज्यांमध्ये केरळ स्टोरीवरुन झालेला वाद समोर आले आहेत. त्यातच तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल राज्यांमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं त्यांना विचारणाही केली होती.

आता पश्चिम बंगालमधील एका दिग्दर्शकानं तयार केलेल्या द डायरीज ऑफ वेस्ट बंगाल नावाच्या चित्रपटानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून डायरीज ऑफ वेस्ट बंगालची चर्चा होती. त्यातून पश्चिम बंगालची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप प्रशासनाकडून करण्यात आला आहे. यानंतर प्रशासनाकडून या चित्रपटाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.

Also Read - Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!

सनोज मिश्रा यांनी द डायरीज ऑफ वेस्ट बंगालचे दिग्दर्शन केले असून सोशल मीडियावर त्याबाबत मोठी चर्चा आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची दबक्या आवाजात चर्चा होती. बंगाल पोलीस संचालक यांनी हा चित्रपट बंगालची प्रतिमा मलिन करणारा आहे. त्यातून वातावरण अशांत होण्याची शक्यता आहे. असे म्हणून निर्मात्यांच्या विरोधात नोटीस जाहीर केली आहे. एएनआयनं ट्विट करुन याविषयी आधिक माहिती दिली आहे.

त्या ट्विटमध्ये उल्लेख केल्यानुसार, हा चित्रपट पश्चिम बंगाल विषयक वेगळी प्रतिमा तयार करणारा आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांना ३० मे रोजी सीआरपीसीच्या ४१ कलम अ नुसार चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. तसेच आणखी वेगवेगळ्या कलमानुसार त्यांच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

वसीम रिज्वी यांच्या बॅनरच्या सहकार्यातून तयार होणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती नारायण सिंह यांनी केली आहे. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याचे सांगण्यात आले आहे.